
देने वाला जब भी देता... ! रातोरात करोडपती झालेले गाव; एकाच वेळी १५० जणांना...
एका गावात राहणाऱ्या 165 लोकांचे नशीब एका रात्रीत उजळले आहे. गावातील लोकांनी एकत्रितपणे लॉटरीत 1200 कोटींहून अधिक रक्कम जिंकली आहे. अशा प्रकारे प्रत्येकाच्या खात्यात सुमारे 7 कोटी 50 लाख रुपये आले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर बेल्जियमच्या अँटवर्प प्रांतात असलेल्या ओल्मेन गावात जल्लोषाचे वातावरण आहे.
डेली मेलनुसार, ओल्मेन गावातील 165 लोकांनी मिळून युरोमिलियन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. त्यासाठी प्रत्येकाने 1,308 रुपये दिले होते. मंगळवारी लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला, त्यामध्ये गावातील लोकांचा लॉटरी क्रमांक होता. आता त्यांना 123 दशलक्ष पौंड बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय चलनात ही रक्कम 1,200कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा : Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’
ही रक्कम 165 लोकांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या खात्यात सुमारे साडेसात कोटी रुपये येतील. लॉटरी काढण्यापूर्वीच बक्षिसाची रक्कम सर्वांमध्ये समान वाटली जाईल, असे गावकऱ्यांनी ठरवले होते. काही लॉटरी विजेत्यांनी याचे वर्णन 'सर्वोत्तम ख्रिसमस गिफ्ट' असे केले आहे.
नॅशनल लॉटरीचे प्रवक्ते जॉक वर्मोरे म्हणाले की, ग्रुपमध्ये अशा प्रकारे बक्षीस जिंकणे ही नवीन गोष्ट नाही. 165 लोकांचा हा ग्रुप आतापर्यंतचा सर्वात मोठा लॉटरी विजेता आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आम्हाला 5 ते 6 वेळा लॉटरी जिंकल्याची घोषणा पुन्हा पुन्हा सांगावी लागली.
कारण लोकांचा विश्वास बसत नव्हता की, त्यांनी एवढी मोठी रक्कम जिंकली आहे. सध्या तरी विजेत्यांची ओळख उघड झालेली नाही. ब्रिटनमधील एका व्यक्तीने या वर्षी जुलैमध्ये 195 दशलक्ष पौंड (19000 कोटी) बक्षीस जिंकले होते.