"झिरो बेस बजेट' - अल्पकाळातील आधार 

डॉ. वीरेंद्र ताटके 
Monday, 25 May 2020

काही खर्च अल्पकाळासाठी अनुत्पादक वाटत असले तरी दीर्घकाळात त्यापासून फायदा होऊ शकतो. मात्र आर्थिक चणचणीच्या वेळी 'झिरो बेस बजेट' हा पर्याय निवडून प्रत्येक व्यक्ती अडचणींवर मात करू शकते.

"झिरो बेस-बजेट अर्थात शून्य-आधारित बजेट या बजेटच्या प्रकारात त्याच्या नावाप्रमाणे प्रत्येक खर्च हा "शून्य' मानून बजेटची सुरुवात केली जाते . वरवर पाहताना हा पर्याय किचकट वाटत असला तरी त्याचा प्रभावी वापर अल्पकाळासाठी करता येतो. साधारणतः वर्ष 1970 च्या आसपास बजेट तयार करताना 'झिरो -बेस' ही नाविन्यपूर्ण संकल्पना पीटर पायहर या अर्थतज्ज्ञाने अमलात आणली आणि त्यानंतर अनेक व्यवसायात विशेषतः सरकारी खात्यांमध्ये याचा उपयोग करण्यात आला होता . 
पारंपरिक बजेटमध्ये पुढील खर्चाचे अंदापत्रक करताना चालू वर्षातील खर्चाच्या रकमेचा आधार 'बेस' म्हणून घेतला जातो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"झिरो बेस बजेट'मध्ये मात्र पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन करताना पुढील प्रश्न विचारले जातात. 

1) हा खर्च करणे अत्यावश्‍यक आहे का ? 

2) या खर्चासाठी इतर पर्याय आहेत का ? 

3)संबंधित खर्च शून्य झाल्यास त्याचा उत्त्पन्नावर काय परिणाम होईल? 

थोडक्‍यात कोणत्याही खर्चाला व्यवस्थापनकडून मजुरी घेण्यापूर्वी त्याचे योग्य समर्थन संबंधित अधिकाऱ्याला करावे लागते अन्यथा अशा खर्चात कपात केली जाते . 

प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या खर्चाचे नियोजन करताना या "झिरो-बेस-बजेट' संकल्पनेचा आधार घेऊन आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवू शकतो. विशेषतः सध्याच्या कालावधीत जेव्हा आपल्या उत्त्पन्नावर मर्यादा येण्याची शक्‍यता असते तेव्हा प्रत्येक खर्चाचे अशाप्रकारे ऑडिट स्वतःच करणे आवश्‍यक आहे . 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उदाहरणार्थ, गेले काही महिने एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न चाळीस हजार रुपये प्रतिमहा आहे आणि त्याचा खर्च तीस हजार रुपये प्रतिमहिना आहे असे मानुयात. मात्र सध्याच्या कठीण काळात अशा व्यक्तीचे उत्पन्न कमी होऊन पंचवीस हजार रुपये प्रति महिना झाले असेल तर त्या व्यक्तीने खर्च नियंत्रणात ठेवणे आवश्‍यक आहे. असे करताना प्रत्येक खर्च नियंत्रणात ठेवणे शक्‍य नसले तरी अशा व्यक्तीने वर दिलेले तीन प्रश्न स्वतःला विचारले तर त्याचे उत्तर मिळू शकते. 

आपल्या खर्चात अचूकता आणण्याचे महत्वाचे काम "झिरो बेस बजेट'च्या साहाय्याने करता येते. तसेच आपली कार्यक्षमता वाढविण्यास ते मदत करते. उदाहरणार्थ घरकामासाठी आपण पगारी नोकर ठेवत असलो तर असे काम आपण स्वतः करू लागलो तर खर्च कमी होतातच शिवाय आपली कार्यक्षमता वाढते. याशिवाय अनुत्पादक गोष्टींवर होणारे खर्च लक्षात येऊन त्यावर नियंत्रण ठेवणे या पद्धतीने सोपे जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालून अल्पकाळासाठी आपण आर्थिक अडचणीतून मार्ग काढू शकतो. अर्थात "झिरो बेस बजेट'च्या काही मर्यादा देखील आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे असे नियोजन फक्त थोड्या कालावधीसाठी करता येते . कायमस्वरूपी असा दृष्टिकोन ठेवल्यास आवश्‍यक खर्चांकडे दुर्लक्ष होऊन त्याचा फटका बसू शकतो. शिवाय काही खर्च अल्पकाळासाठी अनुत्पादक वाटत असले तरी दीर्घकाळात त्यापासून फायदा होऊ शकतो. मात्र आर्थिक चणचणीच्या वेळी 'झिरो बेस बजेट' हा पर्याय निवडून प्रत्येक व्यक्ती अडचणींवर मात करू शकते.

आणखी बातम्या व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virendra tatke article about Zero base budgeting - short-term basis

Tags
टॉपिकस