व्होडाफोन-आयडिया 25 हजार कोटींचा निधी उभारणार 

वृत्तसंस्था
Thursday, 21 March 2019

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने 25 हजार कोटींचा राईट इश्यु आणण्याच्या निर्णय घेतला आहे. कंपनीने राईट इश्युसाठी 12.50 रुपये प्रतिशेअर किंमत निश्चित केली आहे.  कंपनीच्या सध्याच्या बाजारातील शेअरच्या किंमतीपेक्षा राईट इश्युद्वारे देण्यात येणाऱ्या शेअरची किंमत 60 टक्क्यांनी कमी ठेवण्यात आली आहे. 

राईट इश्यु 10 एप्रिल रोजी खुला होणार असून तो 24  एप्रिलपर्यंत खुला राहणार आहे. पात्र शेअरधारकांना 38 शेअरच्या मागे 87 शेअर दिले जाणार आहेत. यासाठी कंपनीकडून 2 एप्रिल 'रेकॉर्ड डेट' जाहीर करण्यात आली आहे. 

ब्रिटिश व्होडाफोन समूह आणि आदित्य बिर्ला समूह  राईट इश्युच्या माध्यमातून क्रमशः 11,000 कोटी आणि 7,250 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करणार आहेत. शिवाय राईट इश्यु अंडर-सब्सक्राइब राहिल्यास कंपनीच्या प्रवर्तकांकडून आणखी काही शेअर खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. 

काल मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन-आयडियाचा शेअर 3.13 टक्क्यांनी वधारून 33 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 28 हजार 827.34 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vodafone Idea prices ₹25,000 crore rights issue at 12.5 a share