Mutual Funds Investment Tips: हवाय जास्त परतावा? 'या' टिप्स करा फॉलो

Mutual Funds Tips in Marathi
Mutual Funds Tips in MarathiSakal

Mutual Fund News: म्युचअल फंडमधून निश्चितच चांगला रिटर्न मिळतो. पण त्यातही शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे खूप रिस्क असते. तुम्ही जर आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये वैविध्य ठेवला तर तुम्हाला कमीत कमी नुकासान आणि जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. म्युचअल फंड पोर्टफोलिओ( mutal Fund Portfoila)मध्ये तुमची गुंतवणूक एका ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी असली पाहिजे. पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्ण असायला हवा. गुंतवणूकीला विभिन्न संपत्तीमध्ये वाटणे म्हणजेच असेट अॅलोकेशन असते.(Want Higher returns from Mutual Funds Follow these tips)

योग्य पोर्टफोलियाचा निमय आहे की गुंतवणूकीपूर्वी त्यामागील करण्याचा हेतू आणि कालावधी मर्यादा निश्चित केली पाहिजे. गुंतवणूकीची मर्यादा जितकी जास्त असेल तितके चांगला रिर्टन इक्विटी फंडमध्ये मिळतो. (Mutual Funds Tips in Marathi)

रिस्क क्षमतानुसार गुंतवणूक (Mutal Fund SIP Investment)

बाजारामध्ये प्रत्येक चढ- उतारानंतर म्युचअल फंडपेक्षा 15 टक्के जास्त रिर्टन मिळू शकतो. आणि हा रिर्टन तुमच्या पोर्टपोलिओच्या व्हरायटीवर आधारित असते. आपली रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार तुमचे असेट अलोकेशन ठरते. जर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत असाल तर इक्विटी फंडमध्ये अधिक परतावा मिळू शकतो. लक्षात ठेवा जितकी जास्त रिस्क होते आणि तितका परतावा जास्त.

जर रिस्क घेण्याची क्षमता कमी असेल तर इक्विटमध्ये गुंतवणूक कमी होईल. येथे तुम्ही जास्त रिटर्नची आशा करू शकत नाही. तुम्ही Debt फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे.

गुंतवणूक करण्याआधी अभ्यास नक्की करा (Mutual Fund Investment tips)

म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कोणाच्याही सांगण्यावर आणि ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून कधीही करू नका. गुंतवणूक करण्याआधी फंड हाऊस रिटर्न हिस्ट्रीचा अभ्यास करा. रिर्टन हिस्ट्री केवळ 1-2 वर्षांचा इतिहास नव्हे तर 10 वर्षांचा रेकॉर्ड बघा. फंड हाऊस मॅनेजरबाबतीही माहिती जाणून घ्या.

पोर्टफोलिओ तयार करणे (mutual fund portfolio)

इक्विटी आणि Debt फंड्सचे पोर्टफोलिओ वेगवेगळा तयार करा. Debt पोर्टफोलिओमध्ये व्याजदराची रिस्क कमी आणि क्रेडिट रिस्कवर जास्त लक्ष द्या. व्याज दरमध्ये बदल झाल्यास Debt पोर्टफोलिओ रिटर्नवर परिणाम होतो.

Debt fundमध्ये गुंतवणूक कर असाल तर शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करा. लॉन्ग टर्म गुंतवणूकीवर व्याजदर बदलांचा परिणाम होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com