
घर घ्यायचंय? पगार 25000, जाणून घ्या किती मिळेल Home Loan
Home Loan on Rs 25000 Monthly Salary: नोकरी लागली की सगळ्यात आधी विचार येतो स्वतःचं घर घ्यायचा, पण नोकरीच्या सुरुवातीला पगार जास्त नसतो, जर तुमचा 25000 रुपये मासिक पगार आहे. (Monthlt Income 25000 Rs) तर एवढ्या पगारावर घर घेता येईल का ? बँक किती कर्ज देईल असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील नाही का ? जाणून घेऊयात सविस्तर...
गृहकर्जासाठीची प्रात्रता ?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही पात्रता निकषावर ( Eligibility Criteria) खरे उतरणं गरजेचं आहे. पात्रता निकष बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहेत. जसे की कर्जाचा कालावधी, महिन्याचा पगार, चालू असणारा इएमआय या सगळ्यांचा यात समावेश आहे.
पात्रता निकष कसे मोजतात ?
पात्रता निकषात पगारदार व्यक्तीचे वय 23-62 वर्ष आणि स्वयं रोजगार करणाऱ्या व्यक्तीचे वय 25-70 वर्ष असावे. गृहकर्जासाठी CIBIL स्कोअर 750 असावा. पगारदार आहात तर 3 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे आणि स्वतःचा व्यवसाय असेल तर 5 वर्षांचा अनुभव असायला हवा. पगारदार व्यक्ती 3.5 कोटीचे कर्ज घेऊ शकतो, तर व्यापारी 5 कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
25000 रुपयांच्या पगारावर किती मिळेल गृहकर्ज ?
बजाज फिनसर्व्हच्या मते तुमच्या इन-हँड पगारावर किती गृहकर्ज मिळेल हे अवलंबून आहे. कर्ज देणारी कंपनी तुमची टेक होम सॅलरी ग्राह्य धरते. यात ग्रॅच्यूटी, पीएफ, ईएसआयला वजा केले जाते. तुमची टेक होम सॅलरी 25000 रुपये आहे आणि 25 वर्षांसाठी कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला 18.64 लाख रुपये कर्ज मिळू शकते. जर टेक होम सॅलरी 50,000 आहे तर तुम्हाला 37.28 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकेल. जेवढी टेक होम सॅलरी जास्त तेवढीच कर्जाची पात्रता वाढत जाते.
कर्ज घेण्याआधी काय कराल ?
क्रेडिट स्कोअरपासून सिबिल स्कोअर चांगला असणे गरजेचं आहे. तुमचं वयही यात महत्त्वाचा भाग आहे. वयावरुनच त्यांना अंदाज लावता येतो की तुम्ही किती वेळेत गृहकर्ज निपटवू शकता.
गृहकर्ज पात्रता कशी वाढवाल ?
तुमच्या नावावर एखादे कर्ज सुरु असेल तर ते सगळ्यात आधी संपवा. तुम्ही संयुक्त (Joint) गृहकर्जही घेऊ शकता.