Share Market : शेअर बाजारात घसरण! पण गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नामी संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

तुम्हीसुद्धा नव्याने काही शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करु शकता.

शेअर बाजारात घसरण! पण गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नामी संधी

Stocks to Buy : कमजोर जागतिक संकेत आणि ओमिक्रॉनमुळे (Omicron) शेअर बाजारात (Share Market) पडझड झाली. पण यामुळे निराश न होता, शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी 2 शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कारण हीच वेळ असते जेव्हा तुम्ही काही चांगले शेअर्स कमी दरात तुमच्या पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) समाविष्ट करु शकता. तुम्हीसुद्धा नव्याने काही शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करु शकता.

हेही वाचा: ओमिक्रोनचे बाजारावर सावट! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

विकास सेठींची निवड

विकास सेठी यांनी फ्युचर्स मार्केटमधील 2 मजबूत स्टॉक्स (Stocks) निवडले आहेत. यात त्यांनी ग्लेनमार्क फार्मा (Glenmark Pharma Fut) आणि भारती एअरटेलचे (Bharti Airtel Fut) शेअर्स घेण्याचा सल्ला दिला आहे.

ग्लेनमार्क फार्मामध्ये (Glenmark Pharma) खरेदीचा सल्ला

विकास सेठींनी फ्युचर्स मार्केटमध्ये फार्मा सेक्टरच्या ग्लेनमार्क फार्मामध्ये (Glenmark Pharma) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आता या स्टॉकमध्ये चांगली रिकव्हरी (Recovery) दिसून येईल असा सेठींना विश्वास आहे. व्हॅल्युएशनच्या बाबतीत ही फार्मा क्षेत्रातील अत्यंत स्वस्त कंपनी आहे आणि त्यांचे फंडामेंटल्सही चांगले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: 2022 मध्ये धमाका उडवणारा मल्टीबॅगर स्टॉक तुमच्याकडे आहे का?

ग्लेनमार्क फार्मा (Glenmark Pharma)

- सीएमपी (CMP) - 485.85 रुपये

- टारगेट (Target) - 500 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 475 रुपये

भारती एअरटेलमध्ये (Bharti Airtel) खरेदीचा सल्ला

विकास सेठी यांनी शॉर्ट टर्मसाठी या मजबूत शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक त्याच्या उच्चांकी किंमतीपेक्षा खूपच खाली आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळेच या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ असल्याचे सेठी म्हणत आहेत. येत्या 2-3 दिवसांत जर बाजारात रिकव्हरी (Recovery) दिसली तर भारती एअरटेलला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: नवा आठवडा, नवा दिवस कसा असेल शेअर बाजारासाठी?

भारती एअरटेल (Bharti Airtel)

- सीएमपी (CMP) - 659.20 रुपये

- टारगेट (Target) - 675 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 650 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Weak Global Signals And Omicron Led The Stock Market To Fall

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top