शेअर बाजारातील IPO म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipo

शेअर बाजारातील IPO म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता होय. इथं एक दिवसात लाखो रुपये कमावणारा व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली येतो. त्यामुळे शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक करावी लागते. जर नुकसान झाले तर त्यांची जोखीम सहन करण्याची तयारी असावी लागते. सध्याच्या काळात अगदी सामान्य माणूस देखील शेअर बाजारात पैसे गुंतवू लागला आहे. यामध्ये तरुण वर्गाची संख्या मोठी आहे. त्यामुळे शेअर बाजार आता 'लोकल टू ग्लोबल' झाला आहे. शेअर बाजारात पैसे गुंतविणे फार अवघड नाही, पण त्यापूर्वी थोडासा अभ्यास करणे गरजेचे आहे. शेअर बाजारात पैसे गुंतविण्यापूर्वी थोडासा प्राथमिक अभ्यास करा, मार्केटवर लक्ष द्या आणि त्यानंतर गुंतवणूक करा. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत. (What is a stock market IPO Learn in detail aau85)

1) प्रायमरी मार्केट

2) सेकंडरी मार्केट

प्रायमरी मार्केट - प्रायमरी मार्केटमध्ये आईपीओद्वारे पैसे गुंतविले जातात. आता तुम्ही विचार कराल आयपीओ म्हणजे काय? कारण सध्या आयपीओ हा शब्द खूपच चर्चेत आहे. तर सर्वप्रथम आपण आयपीओ म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग होय. जेव्हा एखादी मोठी कंपनी शेअर बाजारात पहिल्यांदा त्यांचे शेअर विक्रीसाठी काढते तेव्हा त्यास आयपीओ म्हणतात. या प्रक्रियेत त्या कंपनीचे शेअयर्स सामान्य नागरिकांना खरेदीसाठी खुले केले जातात. अगदी साध्या भाषेत संगायचे झाले तर कंपनी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शेअयर्सच्या माध्यमातून निधी जमा करते. हा निधी कंपनी त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी वापरते. त्या बदल्यात सामान्य नागरिकांना त्यांचे शेअयर्स मिळतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे भागीदार झालेले असतात. तुमचे जितके शेअर्स तितकी तुमची भागीदारी. एखादी कंपनी अनेकदा त्यांच्या कंपनीचे आयपीओ बाजारात आणू शकते. आयपीओद्वारे कंपन्याना त्यांचा विस्तार करणे सुलभ जाते.

आयपीओ बाजारात आणण्याची कारणे

कंपनीचा विस्तार व्हावा - जेव्हा एखादी कंपनी सतत नफा कमावत आहे, तेव्हा त्या कंपनीला वाटते आपण आपल्या व्यवसायाचा अधिक विस्तार करायला हवा. कंपनीचा विस्तार अधिकाधिक शहरात व्हावा. अशा वेळेस कंपनी व्यवसाय वाढीसाठी आयपीओ काढते. एखादी कंपनी व्यवसाय वाढीसाठी बँकेकडून कर्ज देखील घेऊ शकते, पण कर्जाला मर्यादा असतात, तसेच घेतलेले कर्ज ठराविक वेळेत फेडावे लागते. त्यावर व्याज देखील द्यावे लागते. जर त्या कंपनीने आयपीओ काढला तर त्यांना पैसे देखील परत करावे लागत नाहीत, त्याबरोबरच व्याज देखील भरावे लागत नाही. त्यामुळे अनेक कंपन्या चांगला विस्तार व्हावा यासाठी आयपीओ काढतात.

ज्याप्रमाणे आयपीओद्वारे कंपनी जसा फायदा होतो तसेच जे आयपीओ खरेदी करतात त्यांना देखील फायदा होतो. जसे की तुम्ही एखाद्या कंपनीचे आयपीओ द्वारे दोन टक्के शेअर्स विकत घेतले आहेत, म्हणजे तुमची त्या कंपनीत दोन टक्के भागीदारी झाली आहे. एकूणच काय तुम्ही त्या कंपनीचे 2 टक्के मालक आहात. त्यामुळे आयपीओमध्ये ग्राहक आणि कंपनी दोन्हीचा फायदा होतो.

कर्ज कमी करण्यासाठी - एखादी मोठी कंपनी जेव्हा कर्जबाजारी होते तेव्हा देखील आयपीओ काढला जातो. त्या कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी कंपनीचा काही समभाग आयपीओद्वारे विक्रीसाठी काढला जातो. यामुळे कंपनीला नवीन भागीदार आणि गुंतवणूकदार मिळतात. कर्जबाजारी झालेल्या कंपनीला नवसंजीविनी मिळते. बँकेकडून कर्ज घेण्यापेक्षा अनेक कंपन्या त्यांचा समभाग आयपीओद्वारा विक्रीस काढतात.

नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी - एखादी कंपनी त्यांचे नवीन उत्पादन बाजारात यावे आणि ते अधिक प्रसिद्ध व्हावे यासाठी देखील त्या कंपनीद्वारे आयपीओ काढला जातो. नवीन लॉंच केलेल्या उत्पादनाचे अधिक प्रमोशन व्हावे यासाठी आयपीओ काढला जातो. आयपीओमुळे उत्पादन अधिक लोकांपर्यंत पोहचते.

नुकताच बाजरात झोमॅटोचा आयपीओ लॉंच झाला होता. एसबीआयनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेला आयपीओ हा झोमॅटोचा असेल. झोमॅटोच्या आयपीओ चांगलाच भाव खाल्ला. या मूळ आयपीओ किंमत ही 76 रुपये प्रती शेअर्स इतकी होती. त्यामध्ये नंतर तब्बल ५१ टक्के इतकी वाढ झाली. 76 रुपयांवर सुरू झालेली विक्री आता 139 रुपयांना पर्यत पोहोचली होती.

पुढील भागात आयपीओचे प्रकार जाणून घेऊया....

Web Title: What Is A Stock Market Ipo Learn In Detail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share Market