esakal | ‘पीपीएफ’कडे आजच लक्ष का द्यायला हवे?
sakal

बोलून बातमी शोधा

ppf

सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी म्हणजे पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे.

‘पीपीएफ’कडे आजच लक्ष का द्यायला हवे?

sakal_logo
By
मुकुंद लेले

नवी दिल्ली- सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी म्हणजे पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे. ही १५ वर्षांची दीर्घकालीन योजना असून पाच-पाच वर्षांसाठी कितीही वेळा वाढविता येते. नेमकी योजना नेमकी काय आहे आणि याचा कशाप्रकारचे लाभ घेता येईल हे आपण पाहूया.

- सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ) ही एक सरकारी योजना आहे.
- ही १५ वर्षांची दीर्घकालीन योजना आहे. त्याची मुदत पाच-पाच वर्षांसाठी कितीही वेळा वाढविता येते.
- एका आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये व जास्तीत जास्त १.५० लाख रुपये भरता येतात.
- ही रक्कम वर्षभरात किमान एकदा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा भरता येते.
- ‘पीपीएफ’मध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पैसे भरल्यास संपूर्ण वर्षाचे व्याज मिळू शकते.
- महिन्याच्या पाच तारखेपर्यंत भरलेल्या पैशावर त्याच महिन्यापासून व्याज मिळू शकते.
- जितक्‍या कमी वयात खाते उघडले जाईल, तितका त्याचा फायदा अधिक आहे.
- स्वतःच्या नावे, तसेच अज्ञान मुला-मुलींच्या नावे ‘पीपीएफ’चे खाते उघडता येते.
- निवडक बॅंका आणि टपाल कार्यालयांत (पोस्ट) हे खाते उघडता येते.
- एका व्यक्तीला एकच खाते उघडता येते.
- हे खाते एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत किंवा पोस्टात ‘ट्रान्स्फर’ करता येऊ शकते.
- ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावट मिळते.
- यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज (चालू तिमाहीत ७.१ टक्के) अजून तरी करमुक्त आहे.
- सरकारच्या धोरणानुसार, ‘पीपीएफ’चा व्याजदर दर तिमाहीला बदलता राहू शकतो.
- ‘पीपीएफ’च्या खात्यातून सहा आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार अंशतः पैसे काढता येतात.
- करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्न देणारी ही सुरक्षित योजना आहे.

loading image
go to top