
आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड, मागच्या आठवड्यातील घसरणीचा या आठवड्यावर काही परिणाम होईल का ?
गेल्या आठवड्यात कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर सावट राहिले. गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 1,282.89 अंकांनी अर्थात 2.13 टक्क्यांनी खाली 58,765.58 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 321.2 अंक अर्थात 1.79 टक्क्यांच्या घसरणीसह 17,532 वर बंद झाला. सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे 3-3 टक्क्यांची वाढ दिसून आली.
बीएसई लार्जकॅप निर्देशांकात गेल्या आठवड्यात 1.6 टक्के घट दिसून आली. या घसरणीत टेक महिंद्रा, एचडीएफसी मॅनेजमेंट कंपनी, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक, एशियन पेंट्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि बजाज फिनसर्व या कंपन्यांचा समावेश राहिला.. तर टाटा मोटर्स - डीव्हीआर, कोल इंडिया, एनटीपीसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एचपीसीएल, आयओसी आणि ओएनजीसी या कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला.
शुक्रवारी मिडकॅप निर्देशांक फ्लॅट बंद झाला. आयडीबीआय बँक, टाटा पॉवर कंपनी, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, ऑईल इंडिया, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर, कॅनरा बँक, जिंदाल स्टील अँड पॉवर, एयू स्मॉल फायनान्स बँक, जेएसडब्ल्यू एनर्जी 10-28 टक्क्यांपर्यंत वाढले. दुसरीकडे, एमफॅसिस, माइंडट्री, कमिंस इंडिया, झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेज, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज, श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांस कंपनी, बालकृष्ण इंडस्ट्रीज, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि पेज इंडस्ट्रीजमध्ये घसरण दिसून आली.
सोमवारी अर्थात आज कोणत्या स्टॉक्सवर नजर ठेवाल ?
सध्या उत्सवांचा काळ सुरू होतो आहे. अशात आज तुम्ही अशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, या स्टॉक्सवर नजर ठेऊ शकता.
सोबतच FMCG शेअर्सवर देखील नजर ठेवा. यामध्ये तुम्ही हिंदुस्थान युनिलिव्हर, मॅरिको आणि ITC या शेअर्सवर लक्ष ठेवा. याशिवाय DIXON टेक्नॉलॉजी, बजाज फायनान्स, HDFC या शेअर्सवर देखील नजर ठेवा.
क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.