आज शेअर बाजारात काय घडेल ? जाणून घ्या टॉप 10 शेअर्सची लिस्ट

Todays Share Market Updates
Todays Share Market UpdatesFile Photo

सोमवारी सेन्सेक्स(Sensex) 85.88 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 61,308.91 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी(Nifty) 52.35 अंकांच्या किंवा 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 18,308.10 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 154 अंकांनी घसरून 38,216 वर बंद झाला.(Todays Share Market Updates)

मिडकॅप(MidCap), स्मॉलकॅप(SmallCap Shares) शेअर्समध्ये खरेदी झाली. स्मॉलकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाला. त्याच वेळी, ऑटो निर्देशांक 2 महिन्यांच्या उच्च पातळीवर बंद करण्यात यशस्वी झाला. सिमेंट, फर्टिलायजर शेअर्स तुफान चालले.

सेन्सेक्सचे 30 पैकी 19 शेअर्स वधारले तर निफ्टीच्या 50 पैकी 34 शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्समध्ये घसरण झाली. डॉलरच्या(Doller) तुलनेत रुपया(Rupees) 9 पैशांनी कमजोर होऊन 74.24 वर बंद झाला.(What will happen in the stock market today Find out the list of top 10 shares)

Todays Share Market Updates
पहिल्यांदा Persoanl Loan घेताय! लक्षात ठेवा पाच गोष्टी

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर बुलिश कँडल तयार केल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चंदन तापडिया म्हणाले. गेल्या 7 ट्रेडिंग सत्रांपासून ते उच्चांकी पातळीवर आहे. आता निफ्टीला 18400-18600 च्या वर जाण्यासाठी 18250 च्या वरच रहावे लागेल. त्याच वेळी, 18181-18081 च्या स्तरावर सपोर्ट असल्याचेही ते म्हणाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास, निर्देशांकाने त्याच्या आधीच्या उच्चांकी पातळीच्यावर ब्रेकआउट दिला आहे आणि डेली टाईम फ्रेमवर बुलिश कँडल तयार केली आहे जी या काउंटरमध्ये अपसाईड रॅलीचे संकेत देत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. तर निफ्टी Ichimoku cloud वर व्यवहार करत आहे, ज्यामुळे तो आणखी मजबूत होत असल्याचे ते म्हणाले.

ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्ससाठी 18225 ची पातळी खूप महत्त्वाची असेल, ज्यावर लक्ष ठेवले पाहिजे असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जर निफ्टी या पातळीच्यावर राहिली तर 18375-18400 च्या दिशेने जाताना दिसेल. पण, जर निफ्टी 18225 च्या खाली घसरला तर एक मोठा इंट्राडे करेक्शन नाकारता येत नाही आणि आपण निफ्टी 18150-18100 च्या दिशेने जाताना पाहू शकतो अशी माहिती त्यांनी दिली.

Todays Share Market Updates
क्रेडिट कार्डवर बचत करायचीय? कॅशबॅक, डिस्काउंटद्वारे कशी करता येईल जाणून घ्या!

आजचे टॉप 10 शेअर्स ?

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

ग्रासिम (GRASIM)

ओएनजीसी (ONGC)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

अपोलो टायर्स (APOLLOTYRE)

एक्साइड इंडस्ट्रीज (EXIDEIND)

एलआयसी हाउसिंग फायनान्स (LICHSGFIN)

हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

बाटा इंडिया (BATAINDIA)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com