Budget 2023 : केव्हा अन् कुठे सादर होणार बजेट? जाणून घ्या, कसा पहाल लाईव्ह प्रोग्राम... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2023

Budget 2023 : केव्हा अन् कुठे सादर होणार बजेट? जाणून घ्या, कसा पहाल लाईव्ह प्रोग्राम...

Budget 2023 : अर्थ मंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारीला संसदमध्ये केंद्रीय बजेट 2023-24 सादर करणार आहे. या बजेटकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहेत. याशिवाय मोदी सरकारचं 2024 च्या लोकसभापूर्वींचं हे शेवटचं बजेट असणार आहे. त्यामुळे हे बजेट सर्वांसाठी विशेष महत्त्वाचं आहे.

हे बजेट सेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बजेट सादर केले जाईल. या बजेट सेशनची सुरवात 31 जानेवारीला होणार तर या दिवशी अर्थ मंत्री आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आणि यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थातच 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता बजेट सादर केले जाणार. (where and how to watch live Union Budget session Finance minister nirmala sitharaman will present )

लाईव्ह प्रोग्राम कसा पहाल?

जर तुम्हाला बजेटच्या घोषणा ऑनलाइन पाहायच्या असतील तर तुम्ही पीआईबी आणि संसद टीवीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. टिव्हीवर केंद्रीय बजेटचे लाईव्ह प्रोग्राम तुम्ही दूरदर्शन किंवा संसद टिव्हीवर पाहू शकता.

याशिवाय मनीकंट्रोल साईटसुद्धा सुद्धा बजेट लाइव्ह स्ट्रीमिंगपासून बजेटच्या काही मुख्य हाइलाइट्ससुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करुन देणार. सोबतच एक्सपर्ट्सच्या कमेंट्सद्वारे तुम्ही बजेटविषयी खोलवर जाणू शकता. मनीकंट्रोलशिवाय हिंदी, इंग्रजी आणि भाषिक चॅनेलवरही याचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार.

हेही वाचा: Budget 2023 : निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पापूर्वीच वाटले कोट्यवधी रुपये; 'या' लोकांना झाला फायदा

मोदी सरकारने बजेटच्या आधी टॅक्सपेयर्स खुश केलंय..
बजेटला घेउन सामान्य व्यक्ती आणि टॅक्सपेयर्स यांना भरपूर आशा आहे. बजेट अजून सादर करायचाच आहे मात्र या आधीच सिनिअर टॅक्सपेयर्सला मोदींनी आनंदाची बातमी दिली आहे. कर भरणाऱ्यांना आता आईटीआर (ITR Filing) भरण्यास सुट दिली जात आहे.

अर्थ मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन याविषयी ट्वीट करत 75 वर्षाच्या अधिक असणाऱ्या नागरिकांना ज्यांचा इनकम स्त्रोत फक्त पेंशन आणि बँकेतून येणारे व्याज आहे त्यांना आयकर रिटर्न भरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.