एअर इंडिया कंपनीचे इमर्जन्सी लँडिंग होण्यामागे कोण आहेत

पीटीआय
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

एअर इंडिया कंपनीचे इमर्जन्सी लँडिंग होण्यामागे देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची फुकटेगिरी कारणीभूत असल्याचे ‘आरटीआय’माध्यमातून मागविण्यात आलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

नवी दिल्ली - एअर इंडिया कंपनीचे इमर्जन्सी लँडिंग होण्यामागे देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची फुकटेगिरी कारणीभूत असल्याचे ‘आरटीआय’माध्यमातून मागविण्यात आलेल्या माहितीतून उघड झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बड्या मंडळींनी वापरलेल्या चार्टर (खासगी) विमानांचे ८२२ कोटी रुपयांचे भाडे अद्याप थकीत असल्याचे दिसून आले. कमोडोर लोकेश बात्रा (निवृत्त) यांनी एअर इंडियाला अन्य किती लोकांकडून येणी आहेत याची माहिती मागविली होती. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतचा विचार करता व्हीव्हीआयपी मंडळींनी वापरलेल्या चार्टर्ड विमानांचे ८२२ कोटी रुपयांचे भाडे थकीत असल्याचे उघड झाले. यात सुटकेसाठीच्या मोहिमेचे ९.६७ कोटी व परकी पाहुण्यांसाठीच्या १२.६५ कोटी रुपयांचाही समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is behind the emergency landing of the Air India Company