'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1,931 कोटी रुपये होता. कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1:3 बोनस शेअर देणार आहे. म्हणेजच विप्रोच्या 3 शेअरवर आणखी एक शेअर बोनस मिळणार आहे. समजा गुंतवणूकदाराकडे 3 शेअर असतील तर त्याला आणखी एक शेअर मिळणार आहे. याचबरोबर कंपनीने दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक रुपया लाभांश देण्याची घोषणा केली आहे.  

यादरम्यान कंपनीचा महसूल 14 हजार 666 कोटींवरून वाढून 15 हजार 150.6 कोटी रुपयांवर पोचला आहे. त्यात 10.73 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचे प्रतिशेअर उत्पन्न (ईपीएस) वधारले असून ते 5.57 रुपयांवर पोचले आहे. जे गेल्यावर्षी याच तिमाहीत 4.03 रुपये होते. 

गेल्या दोन वर्षात कंपनीने दुसऱ्यांदा बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. वर्ष 2017 मध्ये कंपनीने एकास एक शेअर (1:1) बोनस शेअर दिला होता. शिवाय त्याचवर्षी कंपनीने 11 हजार 000 कोटी रुपयांची शेअर बायबॅक ऑफर आणली होती. 

आज मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने 348.45 रुपयांची वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली. अखेर 2.91 टक्क्यांनी म्हणजे 9.80 वधारून 346.20 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wipro Q3 net jumps 30pct YoY to Rs 2,510 cr, announces 1:3 bonus issue