EPF | नोकरी सोडल्यानंतर PFचे पैसे काढा... नाहीतर आर्थिक नुकसान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरी सोडल्यानंतर PFचे पैसे काढा... नाहीतर आर्थिक नुकसान?

नोकरी सोडल्यानंतर PFचे पैसे काढा... नाहीतर आर्थिक नुकसान?

एरव्ही खासगी क्षेत्रात काम करणारे अनेक लोक एक कंपनी सोडून दुसर्‍या कंपनीत 'स्विच' करत असतात. पण सध्या मार्केटमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना अद्याप दुसरी कोणतीही नोकरी मिळू शकलेली नाही.

अशा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत (EPF) बेफिकीर राहू नका. अन्यथा तुम्हाला दुहेरी तोटा सहन करावा लागू शकतो. वास्तविक नोकरी सोडल्यानंतर, जर तुम्ही तुमच्या EPF खात्यामध्ये कोणताही व्यवहार केला नाही, तर ते ठराविक काळासाठीच सक्रिय राहतं. त्याच वेळी, त्यावर मिळणारे व्याज देखील करपात्र उत्पन्नात रुपांतरित होतं. यामुळे तुम्हाला कर भरावा लागतो.

निष्क्रिय EPF खात्यावर व्याज कधीपर्यंत मिळेल?

नोकरी सोडणाऱ्या बहुतेकांना असं वाटतं की त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील आणि भांडवल वाढत राहील. पण हे काही ठराविक कालावधीसाठीच घडतं. नोकरी सोडल्यानंतर, जर पहिल्या 36 महिन्यांत काहीच पैसे जमा केले नाही तर, EPF खातं निष्क्रिय खात्याच्या श्रेणीमध्ये ठेवलं जातं. अशा परिस्थितीत, तुमचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही 3 वर्षापूर्वी काही रक्कम काढली पाहिजे.

पीएफ खातं कधीपर्यंत राहणार सक्रिय?

सध्याच्या नियमांनुसार, जर कर्मचारी वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्त झाला आणि 36 महिन्यांच्या आत ठेव काढण्यासाठी अर्ज केला नाही, तर पीएफ खाते निष्क्रिय होईल. सोप्या शब्दात सांगायचं तर, कंपनी सोडल्यानंतरही, पीएफ खात्यावर व्याज जमा होत राहील आणि वयाच्या ५५ ​​वर्षापर्यंत ते निष्क्रिय होणार नाही.

पीएफ रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कधी कर आकारला जाईल?

नियमांनुसार, पीएफची रक्कम जमा न केल्यास पीएफ खाते निष्क्रिय होत नाही. मात्र, या कालावधीत मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. 7 वर्षे निष्क्रिय राहूनही पीएफ खात्यावर दावा केला गेला नाही, तर ही रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी (SCWF) मध्ये जाते. EPF आणि MP कायदा, 1952 च्या कलम-17 द्वारे सूट मिळालेले ट्रस्ट देखील ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीच्या नियमांच्या कक्षेत येतात. त्यांना खात्यातील रक्कमही कल्याण निधीमध्ये हस्तांतरित करावी लागेल.

कधीपर्यंत कल्याण निधीमध्ये हस्तांतरण रकमेचा दावा करू शकतो?

पीएफ खात्यात हस्तांतरित केलेली दावा न केलेली रक्कम 25 वर्षे ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये राहते. या दरम्यान, पीएफ खातेदार रकमेवर दावा करू शकतात. तुमच्या पीएफची रक्कम जुन्या कंपनीकडे ठेवण्याचा कोणताही फायदा नाही. वास्तविक, नॉन-वर्किंग कालावधी दरम्यान कमावलेले व्याज करपात्र आहे.

तुम्ही ५५ व्या वर्षी निवृत्त झाल्यास खाते निष्क्रिय होऊ देऊ नका. शक्य तितक्या लवकर अंतिम शिल्लक काढा. वयाच्या ५५ ​​वर्षापर्यंत पीएफ खाते निष्क्रिय होणार नाही. तरीही, जुन्या संस्थेतून नवीन संस्थेत पीएफ शिल्लक हस्तांतरित करणं चांगलं आहे. यामुळे निवृत्तीनंतर चांगली रक्कम जमा होईल.

loading image
go to top