Investment Trends : क्रिप्टोत पुरुषांच्या तुलनेत महिलांची आघाडी

मेट्रो आणि टियर-1 शहरांच्या पलीकडे छोट्या शहरांमध्येदेखील क्रिप्टोचा ट्रेंड नव्याने तयार होत आहे.
Bitcoin
BitcoinSakal

गेल्या काही दिवसात जगभरात क्रिप्टोकरन्सीमध्ये (Investment In Crypto Currency ) गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. भारतातही क्रिप्टोकरन्सीमध्ये (Crypto Currency Trends In India) गुंतवणूक करणाऱ्या तरुणांची संख्येत (Youth Interest In Crypto) झपाट्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे देशातील क्रिप्टोमधील 70 टक्क्यांहून अधिक नवीन गुंतवणूकदार हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. बंगळुरू येथील क्रिप्टो एक्सेंज WazirX ने “हाईलाइट्स एंड ऑब्जर्वेशंस फ्रॉम 2021 : द ईयर ऑफ क्रिप्टो” मधील काही निरीक्षणांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. (Highlights and Observations From 2021: The Year Of Crypto) यात पुरुषांच्या तुलनेत बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये महिलांची आघाडी असल्याचे म्हटले आहे. (Women are more interested to invest in crypto currency)

Bitcoin
एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? या गोष्टींकडे लक्ष द्या

महिलांचा बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा कल अधिक

कंपनीने जाहीर केलेल्या अहवालात क्रिप्टोमध्ये (Crypto) महिला (Women investment In Crypto ) गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या महिलांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय अहवालात स्त्रिया बिटकॉइनमध्ये (Bitcoin) अधिक व्यापार करतात, तर पुरुष शिबा इनूवर अधिक पैज लावत असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त, क्रिप्टोमध्ये व्यापार आणि गुंतवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून यामध्ये 66 टक्के वझीरएक्सचे वापरकर्ते 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

Bitcoin
क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कसे मिळतात रिवॉर्ड्स; जाणून घ्या सविस्तर

मित्रांच्या आणि कुटुंबाच्या सल्ल्याने गुंतवणूकीकडे कल

रिपोर्टनुसार, वझीरएक्सचा यूजर बेस 10 दशलक्ष ओलांडला आहे. WazirX द्वारे आयोजित केलेल्या वापरकर्त्याच्या सर्वेक्षणानुसार, 51 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, ते मित्र आणि कुटुंबाच्या सल्ल्यानुसार क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. सर्वेक्षण केलेल्या 44 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओपैकी 10 टक्के क्रिप्टोचा वाटा आहे. याशिवाय, मेट्रो आणि टियर-1 शहरांच्या पलीकडे छोट्या शहरांमध्येदेखील क्रिप्टोचा ट्रेंड नव्याने तयार होत आहे. गुवाहाटी, कर्नाल, बरेली यांसारख्या छोट्या शहरांमधून वापरकर्त्यांच्या संख्येत 700 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com