esakal | World Bank | चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.3%; जागतिक बँकेचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

World bank

चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.3%; जागतिक बँकेचा अंदाज

sakal_logo
By
ओमकार वाबळे

जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताच्या आर्थिक वृद्धीचे संकेत देण्यात आले आहेत. भारताची अर्थव्यवस्था दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 2021-22 या चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये 'दक्षिण आशिया इकोनॉमिक फोकस'ची बैठक पार पडणार आहे. त्याआधीच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्षात रिअल जीडीपी 8.3%ने वाढण्याची अपेक्षा आहे. हे जून 2021 च्या शेवटच्या अंदाजाशी सुसंगत आहे आणि मार्च 2021 मधील अंदाजानुसार 1.8 टक्के पॉईंट खाली घसरले आहे. दक्षिण आशिया. पुढील वर्षी मध्यम ते 7.5% पर्यंत वाढ अपेक्षित आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ९ .५% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सरकारी अधिकाऱ्यांचा आकडा याच्या थोडा पुढे जाणारा आहे. लसीकरणातील वेगाने अधिक आर्थिक दर स्थिरावण्यासाठी दिलासा मिळू शकतो.

सार्वजनिक गुंतवणुकीतील वाढ, उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन, देशांतर्गत वाढणारी मागणी यामुळे ही वाढ झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. तरीही २०२० मधील प्रभावाच्या तुलनेत या वर्षी कोरोनामुळे पडलेला आर्थिक प्रभाव तुलनेने कमी होता, असे शिफ्टिंग गियर्स: डिजिटलायझेशन आणि सर्व्हिसेस-एलईडी डेव्हलपमेंट या अहवालात म्हटलं आहे. पुढील दोन वर्षांमध्ये वाढ अंदाजे 7% वर स्थिरावण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांद्वारे गुंतवणूक, तसेच पुरवठ्यावरील अडचणी कमी करण्यासाठीच्या सुधारणांबाबत अहवालात माहिती देण्यात आली आहे.

दक्षिण आशियाई देशांनी स्वीकारलेल्या उपाययोजनांमुळे यंदा वाढीचा टक्का कमी-जास्त होऊ शकतो. या वर्षी साथीच्या आजारामुळे बसणारे धक्के जास्त प्रमाणात असूनही २०२० पेक्षा ते कमी आहेत. संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्र 7.1% वर वाढण्याची अपेक्षा आहे. 2021 आणि 2022 मध्ये आणि 2023 मध्ये 5.4 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे, असं जागतिक बँकेने म्हटलंय.

loading image
go to top