चीनी कंपनीने बांधला सर्वात मोठा लस उत्पादन प्रकल्प

वृत्तसंस्था
Thursday, 14 May 2020

जगातील अनेक औषध निर्मिती कंपन्यांना औषधाचे मुख्य घटक,इतर कच्च्या मालाचा पुरवठा चीनमधून केला जातो.चीनची मोठ्या प्रकल्प बांधकामांसाठी ख्याती आहे.अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे

जगातील अनेक औषध निर्मिती कंपन्या लस संधोधनासाठी कार्यरत

* चीनमधील कंपनीने बांधला जगातील सर्वात मोठा लस उत्पादन प्रकल्प
* १० कोटी डोस बनवण्याची क्षमता
* जगातील अनेक औषध निर्मिती कंपन्यांनी कोविड-१९वर लस शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे
* कोरोना हा विषाणू जगातून कदाचित नष्ट होणार नाही त्यामुळे आपण त्याबरोबर जगण्यास शिकले पाहिजे असे डब्ल्यूएचओचे मत

जगभर कोविड-१९ महामारीने मानवजातीसमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अशात प्रत्येक देश या महामारीवर लस शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेषत: औषध निर्मिती कंपन्यांनी कोविड-१९वर लस शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जगातील अनेक औषध निर्मिती कंपन्यांना औषधाचे मुख्य घटक आणि इतर कच्च्या मालाचा पुरवठा चीनमधून केला जातो. चीनची आपल्या मोठ्या प्रकल्प बांधकामांसाठी ख्याती आहे. चीनमधील एक कंपनी, 'फोर्थ कन्स्ट्रक्शन'ने जगातील सर्वात मोठा लस उत्पादन प्रकल्प (व्हॅक्सिन प्लॅंट) बांधल्याचा दावा केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'फोर्थ कन्स्ट्रक्शन'ने बांधलेल्या या लस उत्पादन प्रकल्पाची १० कोटी डोस बनवण्याची क्षमता आहे. या लस उत्पादन प्रकल्पात बायो-सुरक्षिततेची लेव्हल ३ ची सुविधा उपलब्धता आहे आणि मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन केले जाऊ शकते, अशी माहिती चीनी कंपनीकडून देण्यात आली आहे. 

संशोधक आणि तज्ज्ञ कोरोनावरील लसी शोधल्यानंतरच्या परिस्थितीतील तांत्रिक बाबींवर अनेक प्रश्नही उपस्थित करत आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना हा विषाणू जगातून कदाचित नष्ट होणार नाही त्यामुळे आपण त्याबरोबर जगण्यास शिकले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. जगात सध्या असलेल्या अनेक विषाणूंपैकी हा एक विषाणू असेल असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगातील अनेक कंपन्या कोविड-१९ महामारीवर लस शोधण्यात कार्यरत झाल्या आहेत. मॉडर्ना या कंपनीने फेस १ चाचण्या पूर्ण केल्या आहेत. चाचणीतून समोर आलेले निकाल खूप उत्साहवर्धख आहेत. फेस २ चाचण्यांसाठी आपल्याला अमेरिकेच्या फूड अॅंड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) परवानगी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत लस पुरेशी कार्यक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी ६०० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. 

नोवाव्हॅक्स या कंपनीने कोविड-१९ महामारीवर लस शोधण्याबाबत त्यांना खात्री असल्याचे म्हटले आहे. आपल्या चाचण्यांमधून आपल्या खूपच चांगले निकाल मिळाल्याची आणि आपण आता मानवी शरीरावरील चाचण्यांची सुरूवात करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. अमेरिकन कंपनी फायझर आणि तिची जर्मन भागीदार बायोनटेक यासुद्धा कोविड-१९ लसीवरील चाचण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत. 

इंग्लंडमधील कंपनी, 'अॅस्ट्राझेनेका'ने म्हटले आहे की पुढील महिनाभरात त्यांना लशीसंदर्भातील फेस १ चाचणीचे अहवाल उपलब्ध होतील. ही औषध निर्मिती ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे कोविड-१९ लस बनवण्यासाठी कार्यरत आहे. या वर्षाच्या मध्यापर्यत मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेतल्या जातील असे कंपनीला वाटते. चाचण्या संपल्याबरोबर त्याचे उत्पादन सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीचे इंग्लंड, अमेरिका आणि चीन येथे असलेले उत्पादन प्रकल्प कोरोना लस उत्पादनासाठी कार्यरत होणार आहे. याशिवाय सनोफी पॅस्चरनेदेखील ग्लॅक्सोस्मिथलाईनबरोबर लस संशोधन आणि उत्पादनासाठी भागीदारी केली आहे. यासंदर्भातील सनोफीचे दोन प्रकल्प सुरू आहेत. यावर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मानवी शरीरावरील चाचण्यांची सुरूवात करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worlds largestvaccine plant build by Chinese firm