खूशखबर! होलसेलच्या किमती घसरल्या; महागाई कमी होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

जून महिन्यात महागाईत  घट झाली आहे. घाऊक किंमतींचा निर्देशांक 2.02 टक्क्यांवर आला आहे. यामुळे भाजीपाला आणि इंधनाच्या किंमतीं स्थिर झालेल्या दिसून येत आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे.​

नवी दिल्ली : जून महिन्यात महागाईत  घट झाली आहे. घाऊक किंमतींचा निर्देशांक 2.02 टक्क्यांवर आला आहे. यामुळे भाजीपाला आणि इंधनाच्या किंमतीं स्थिर झालेल्या दिसून येत आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे.

मागील 23 महिन्यांमधील हा निच्चांक आहे. त्यामुळे भाज्या तसेच इंधनाच्या किंमती नियंत्रणात आहेत किंवा कमी झाल्या आहेत. मे महिन्यात घाऊक किंमतींच्या निर्देशांकावर आधारित महागाई 2.45 टक्क्यांवर आली होती.

जून 2018 मध्ये ही महागाई 5.68 टक्के होती. जूनमध्ये अन्नधान्याशी संबंधित महागाई 6.98 टक्के होती. तर भाजीपाल्यातील महागाई 24.76 टक्क्यांवर आली होती. मे महिन्यात हीच महागाई 33.15 टक्क्यांवर होती. केंद्र सरकारकडून यासंदर्भातील आकडेवारी देण्यात आली आहे. मात्र मान्सूनच्या अनिश्चितीमुळे अन्नधान्य, भाजीपाला त्याचबरोबर वित्तसंस्थांमधील अस्थैर्य या पार्श्वभूमीवर आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WPI inflation eases to near 2-year low at 2.02% in June