Xiaomi चा 4 लाख 80 हजारांचा फोन बघितला का? (व्हिडिओ)

गौरव मुठे
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे: Xiaomi ने आज (सोमवार) पुण्यात  Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. शिवाय आजपासूनच हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष सवलत दिल्या जाणार असून आकर्षक लाँच ऑफर देखील देण्यात आली आहे. 

पुणे: Xiaomi ने आज (सोमवार) पुण्यात  Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. शिवाय आजपासूनच हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष सवलत दिल्या जाणार असून आकर्षक लाँच ऑफर देखील देण्यात आली आहे. 

Redmi K20 आणि K20 Pro स्पेसिफिकेशन्स : 
Redmi K20 आणि K20 Pro मध्ये अगदी किंचित फरक आहे. डोही फोनमध्ये 6.39 इंच AMOLED डिस्प्ले, स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 एसओसी प्रोसेसर (Redmi K20), क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 एसओसी प्रोसेसर (K20 Pr) देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप. यातील पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh बॅटरी क्षमता आहे. 
 

K20 Pro किंमत: 
6 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज  27999
8 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेज 30999

 

Redmi K20 आणि K20 Pro तीन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये फेल्म रेड, ग्लेशियर ब्लू, आणि कार्बन ब्लॅक असे तीन रंग आहे. 

Redmi K20 सिग्नेचर एडिशन:
Redmi K20 ची सिग्नेचर एडिशन देखील लाँच करण्यात आली आहे. यामध्ये सोने आणि डायमंडचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या मर्यादित सिग्नेचर एडिशनची किंमत ४ लाख ८० हजार ठेवण्यात आली आहे. 

K20 किंमत: 
6 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेज  21999
6जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज 23999

या दोन्ही फोनच्या खरेदीवर एअरटेल कंपनीकडून डबलडेटा मिळेल. यासाठी युजर्सना 249 किंवा 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. शिवाय एअरटेलच्या ग्राहकांना एअरटेल थँक्स गोल्डचे देखील फायदे मिळतील. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास या फोनवर 1 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Xiaomi Redmi K20, Redmi K20 Pro on sale today via Flipkart