esakal | येस बँकमुळं 'फोन पे'ऍपला फटका; ऍपची बँक बदलली जाणार?
sakal

बोलून बातमी शोधा

yes bank crisis impact phonepe users over india

फोन पे ऍपला दुसऱ्या बँकेकडे स्विच होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

येस बँकमुळं 'फोन पे'ऍपला फटका; ऍपची बँक बदलली जाणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : रिझर्व्ह बँकेने अनपेक्षितपणे येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर आता त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. या निर्णयाचा परिणाम खातेदारांवर तर झालाच आहे. पण, युनिफाइड पेमेंटस इंटरफेस (यूपीआय) व्यवस्थेमध्ये पेमेंट्स घसरली असून, फोन पे ऍप धारकांना सगळ्यांत मोठ्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. इतर पेमेंट ऍप्स वापरणाऱ्यांमध्येही ज्यांनी आपले येस बँकेचे अकाऊंट, जोडले आहे. त्यांचीही गोची झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यूपीआयमधअये फोन पे ऍपचा सर्वाधिक वापर होतो. साधारण 2 कोटी लोक रोज फोन पे ऍपच्या माध्यमातून मोबाईल पेमेंट्स करतात. फोन पे ऍपची संपूर्ण सर्व्हिस येस बँकेवर अवलंबून आहे. त्यामुळं फोन पे ऍप वापरणाऱ्यांना शुक्रवार 6 मार्चपासून सर्वाधिक फटका बसला आहे. त्यातच महिन्याचा पहिला आठवडा असल्यामुळं बिलं भरणं आणि इतर खर्चासाठी हे ऍप वापरणं अशक्य झालंय. तसेच या ऍपवरून क्युआर कोड द्वारे होणारी पेमेंट्सही कालपासून थांबली आहेत. देशभरातील एकूण मोबाईल पेमेंटस 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. हा आकडा खूप मोठा असल्याचं सांगितलं जातंय. 

येस बँके संदर्भातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात, फोन पेच्या प्रवक्त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधला. त्यात त्यांनी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवणे शक्य आहे. दुसरीकडे फोन पे ऍपला दुसऱ्या बँकेकडे स्विच होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फोन पे ऍप आता आयसीआयसीआय बँकेशी जोडले जाणार आहे. तसेच यूजरचा यूपीआय आयडीही तोच कायम राहणार आहे. या परिस्थिती युजर फोन पे ऍपसोडून दुसऱ्या ऍपकडे वळेपर्यंत ऍपकडून बँक बदलली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. देशातील 13 कोटी यूपीआय व्यवहारांपैकी जवळपास 40 टक्के व्यवहार हे येस बँकेकडून होत होते. 

येस बँके संदर्भातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्विटरवर सुरू झाले वॉर
दरम्यान, फोन पे ऍप अडचणीत आल्यानंतर, सोशल मीडियावर इतर ऍप आणि फोन ऍप यांच्यात वाक् युद्ध सुरू झालंय. ट्विवटरवर अनेकांनी स्विच चू पेटीएम असे मेसेज करायला सुरुवात केलीय. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मांनी यावर एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'सध्याची परिस्थिती ही सगळ्यांसाठीच एक धडा आहे. म्हणजे कोणत्याही अशा प्रकारच्या ऍपला कोण्या एका बँकेवर अवलंबून ठेवायला नको.'