येस बँकेकडून एमडी आणि सीईओ पदाचा उमेदवार निश्चित 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जानेवारी 2019

मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.  

बँकेच्या संचालक मंडळाने एमडी आणि सीईओपदासाठी एक उमेदवार निश्चित केल्याचे मुंबई शेअर बाजाराला पत्राद्वारे कळविले आहे. नवीन एमडी आणि सीईओच्या नियुक्तीची मंजूरी घेण्यासाठी येस बँक उद्या (ता.10) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे अर्ज सादर करणार आहे. 

राणा कपूर यांना बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर 31 जानेवारीपर्यंतच राहता येईल, असे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच दिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank finalises candidates for post of MD and CEO