येस बॅंकेला दुसऱ्या तिमाहीतही मोठा फटका; तब्बल एवढ्या कोटींचा तोटा

वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

- कॉर्पोरेट करातील बदलांचा बसला फटका

मुंबई : येस बॅंक या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बॅंकेला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 600 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. कॉर्पोरेट करातील बदलांमुळे 709 कोटी रुपयांचा फटका बॅंकेला बसल्यामुळे बॅंकेला तोटा नोंदवावा लागला आहे.

कॉर्पोरेट करातील बदलांमुळे कराव्या लागणाऱ्या तरतूदींना वगळ्यात आले तर येस बॅंकेला 109 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असता. मागील वर्षी याच कालावधीत येस बॅंकेने 964 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.

सप्टेंबरअखेर येस बॅंकेचे एकूण थकित कर्जाचे प्रमाण 5.01 टक्क्यांवरून 7.39 टक्क्यांवर पोचले आह. तर बॅंकेचे निव्वळ थकित कर्जाचे प्रमाण वाढून 2.91 टक्क्यांवरून 4.35 टक्क्यांवर पोचले आहे. सरलेल्या तिमाहीत बॅंकेने 27.3 कोटी डॉलरचे भांडवल क्युआपीच्या माध्यमातून उभारले आहे. भांडवल उभारण्यासाठी इतरही सर्व शक्यतांसाठी येस बॅंक प्रयत्नशील आहे. बॅंकेचे इतर उत्पन्न 946 कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकेने 1,336 कोटी रुपयांच्या तरतूदी केल्या आहेत.

दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात येस बॅंकेचा शेअर 6.11 टक्क्यांनी घसरून 66.10 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: YES Bank reports Rs 600 crore Q2 loss on tax hit