esakal | येस बँकेचा शेअरमध्ये मोठी तेजी; का ते जाणून घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Yes Bank shares rally 39% on binding offer of $1.2 bn from global investor

येस बँकेत भागीदार होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इच्छुक असल्याची माहिती आज खुद्द बँकेनेचे दिल्यानंतर बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ दिसून आली

येस बँकेचा शेअरमध्ये मोठी तेजी; का ते जाणून घ्या!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: येस बँकेत भागीदार होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इच्छुक असल्याची माहिती आज खुद्द बँकेनेचे दिल्यानंतर बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ दिसून आली. मागील काही दिवसांपासून बँक भांडवल उभारणी करण्याच्या प्रक्रियेत आहे. बँकेत भागीदारीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास देश तसेच विदेशातील अनेक संस्था उत्सुक असल्याचे समोर आले होते. मात्र आज खुद्द बँकेनेच हि माहित दिली.

येस बँकेत मालकी मिळविण्याच्या बदल्यात मायक्रोसॉफ्ट 1.2 डॉलर बिलियन म्हणजेच तब्बल 8500 कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे बँकेने जाहीर केले आहे. मात्र, नियामक संस्था सेबी तसेच भागधारकांच्या संमतीनंतरच हा व्यवहार पूर्ण होईल असे देखील बँकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, विदेशी कंपनीला बँकेत पाच टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी घ्यायची असेल तर रिझर्व्ह बँकेची देखील परवानगी आवश्यक असते.

भांडवल उभारणी तसेच डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीशी भागीदारी करावी याप्रकारचे धोरण बँकेने आखले आहे. यानुसार जगप्रसिद्ध टॉप तीन कंपन्या बँकेबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक असल्याचे यावेळी देखील समोर आले होते.

मागील काही महिन्यांपासून प्रवर्तक राणा कपूर यांची मालकी आणि सीईओ पदावर राहण्याचा हट्ट आणि आरबीआयचे नवीन नियम यात खटके उडून बँकेत कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मुद्दा तयार झाला होता. त्यानंतर बँकेचा शेअर 404 वरून घसरून 50 रुपयांपर्यंत पोचला होता. माझ्या बातमीनंतर बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ होऊन 70.30 वर बंद झाला.

loading image
go to top