लॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता तुमच्या पीएफ खात्यातील पैसे ! कसे ते घ्या जाणून...

You can also withdraw money from your PF account during lockdown! Learn how to take that
You can also withdraw money from your PF account during lockdown! Learn how to take that

नवी दिल्ली- कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात तुम्ही तुमच्या प्रोव्हिडेंट फंड खात्यातील(Employee Provident Fund Account) पैसे काढू शकणार आहात. केंद्र सरकारने 28 मार्च, 2020 रोजी एक अधिसूचना जारी केली होती. याअंतर्गत कोरोना महामारीच्या काळात EPF स्कीम, 1952 च्या 68Lनुसार सदस्यांना नॉन-रिफंडेबल आगाऊ रक्कम काढण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तुम्ही किती पैसे काढू शकता?
अधिसूचनेनुसार, EPF सदस्यांची कोविड-19 काळातील आगाऊ रक्कम तीन महिन्यांचे बेसिक वेतन आणि महागाई भत्ता (Dearness Allowance) किंवा खात्यातील एकूण रक्कमेच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक नसायला हवी. म्हणजे तुम्ही PF खात्यातील एकूण रक्कमेच्या 75 टक्के भाग किंवा तीन महिन्याचे बेसिक वेतन आणि महागाई भत्ता यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा-
- तुम्ही EPFO वेबसाईटवर जाऊन PF रक्कम काढण्यासाठी हक्क सांगू शकता.
- जर तुमची याआधी काही आगाऊ रक्कम प्रलंबित असेल, तरीही तुम्ही कोविड-19 PF साठी हक्क सांगू शकता.
- तुम्हाला कोविड-19 PF फंडसाठी फक्त एकदाच हक्क सांगता येईल.

कोविड-19 PF फंडवर हक्क सांगण्यासाठी तुमच्याकडे काय असणे आवश्यक आहे?
-तुमचे UAN(Universal Account Number) सक्रिय असणे आवश्यक आहे.
- तुमचा आधार क्रमांक UAN सोबत जोडलेला हवा.
- तुमचे बँक खाते आणि IFSC कोड UAN सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे. 

कोविड-19 PF फंडसाठी कशाप्रकारे हक्क सांगाल?
-EPFO संकेतस्थळाच्या मेंबर इंटरफेसवर जा
(https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface)
-ऑनलाईन सर्विसेसवर जाऊन क्लेमवर क्लिक करा (Form-31,19,10C आणि 10D)
- आपल्या बँक खात्याची माहिती भरुन स्वत:ला सत्यापित (verify) करुन घ्या.
- त्यानंतर 'Proceed for Online Claim' वर क्लिक करा.
-ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये PF Advance (Form 31) वर क्लिक करा.
- त्यानंतरच्या ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये 'Outbreak of pandemic (COVID-19)' निवडा
- 'Get Aadhaar OTP' वर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाका
- यानंतर तुमचा हक्क विचारार्थ पुढे जाईल.

हक्क सांगितल्यानंतर अर्जाची सद्य स्थिती कशी पाहाल?
-यासाठी तुम्हाला e-sewa संकेतस्थळावर आपल्या खात्यासह लॉगईन करावे लागेल. येथे 'Online Services' टॅबमध्ये जाऊन 'Track Claim Status' वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती समजून येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com