You Know New Year, New Rule,1 january 2021
You Know New Year, New Rule,1 january 2021

New Year's New Rule : थर्टी फर्स्टनंतर बदलणाऱ्या कॅलेंडरसोबत काय- काय बदलणार

नव्या वर्षात काही नवे नियम लागू होणार आहेत. फास्टॅग, जीएसटी, गॅस सिलिंडर, विमा, चेक पेमेंट, कॉलिंग, व्हाट्सएप, वाहनांच्या किंमती यासंदर्भातील नियमावलीत बदल होणार असून याचा थेट नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होणार आहे. तुम्ही जर नव्या नियमावलीकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला याचा मोठा फटकाही बसू शकतो.  तर काही नियम हे नागरिकांच्या फायद्याचे देखील आहेत यात 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या चेकसाठी नव्याने सुरु होणाऱ्या पॉझिटिव्ह पे सिस्टमचा समावेश आहे. 1 जानेवारीपासून सिलेंडरच्या किंमतीमध्येही बदल होणार आहेत. डिसेंबरमध्ये तब्बल दोन वेळा 2 सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घेऊयात नव्या वर्षात लागू होणाऱ्या महत्त्वपूर्ण नियमावलीवर एक नजर.... 
 

1 चेक पेमेंटच्या पद्धतीमध्ये होणार बदल 

पॉझिटिव्ह पे सिस्टम ही एक स्वयंचलित टूल आहे. चेकच्या माध्यमातून फसवणुकीला लगाम लावण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रणालीमध्ये चेक देणाऱ्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, प्राप्तकर्ता आणि पेमेंटची रक्कम याची माहिती पुन्हा द्यावी लागेल. चेक देणारी व्यक्ती एसएमएस, मोबाइल एप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमच्या माध्यमातून याची फेर पडताळणी करु शकतो. बँका 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या धनादेशाला हा नियम लागू करणार आहेत. 

2 सिलेंडरच्या किंमतीमध्ये होणार बदल 

तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किंमती ठरवत असतात. त्यामुळे 1 जानेवारीलाही यात बदल पाहायला मिळेल. डिसेंबरमध्ये दोनवेळा वाढलेल्या किंमतीतून ग्राहकांना दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

3. नव्या वर्षात 1 जानेवारीपासून अल्प हप्त्यावरही मिळणार विमा पॉलिसी

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून कमी हप्त्यात सरळ जीवन विमा  (स्टँडर्ड टर्म प्लॅन) पॉलिसी खरेदी करणे शक्य होणार आहे.  विमा कंपन्यांनी आरोग्य संजीवनी नावाने स्टँडर्ड रेग्युलर हेल्थ इंश्योरंन्स प्लॅन सुरु केल्यानंतर भारतीय विमा प्राधिकरणाने (आयआरडीए) एक साधारण पॉलिसी सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार 1 जानेवारीपासून सरळ जीवन विमा पॉलिसी सुरु होणार आहे.  

4  जीएसटी रिटर्न भरण्याच्या पद्धतीतही बदलणार

वस्तू आणि सेवा कर प्रणालीतही सरकारने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपासून छोच्या करदात्यांना तिमाही रिटर्न भरता येईल. तसेच कराचे मासिक स्वरुपात भरणे शक्य होणार आहे.  पाच कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या ज्या व्यावसायिकांनी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत ज्यांनी रिटर्न भरला आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

5 फास्टटॅग अनिवार्य

1 जानेवारीपासून सरकारने सर्व चारचाकी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य केले आहे. डिजिटलायझेशनला प्रात्साहन देण्यासाठी केंद्र सरकार टोल नाक्यावरील रोकड व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहे. 

6 कॉन्टॅक्टलेस कार्डची मर्यादा वाढणार  

भारतीय रिझव्ह बँक (आरबीआई) एटीएम कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करण्याच्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. आरबीआय यूपीआयच्या माध्यमातून  कॉन्टॅक्टलेस  व्यवहाराची मर्यादा  2000 रुपयांवरुन 5000 रुपये इतकी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

7 लँड लायनवरुन मोबाइलवर कॉल करताना शून्य वापरणे अनिवार्य 

देशभरात लँड लाईनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी 0 नंबरचा वापर अनिवार्य असेल. दूरसंचार विभागाने ट्रायचा प्रस्ताव मान्य केला आहे. नव्या वर्षात हा नियम लागू होणार आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्यास मदत होईल. 
मो

8  या मोबाईमधील व्हॉट्सअप होणार बंद

नव्या वर्षात एंड्रॉयड 4.3 आणि आयओएस-9 (iOS 9) या जुन्या  ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप वापरता येणार नाही.  

9  वाहनांच्या किंमती वाढणार

नव्या वर्षात वाहन खरेदी करणे महागडे ठरणार आहे. स्टील, अॅल्युमेनियम आणि प्लॅस्टिकच्या कंपन्यांनी उत्पादन दर वाढवल्यामुळे चार चाकी वाहन निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या कारच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहेत.  

10 पीएफ (PF) वरील व्याज 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (EPFO)  2019-20 या अर्थिक वर्षासाठी जवळपास 6 कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात  8.5 टक्के व्याज जमा करणार आहे. नव्या वर्षात भविष्यनिधी खातेधारकांना याचा लाभ मिळेल. 

11  टीव्ही, फ्रिज वाशिंग मशीनच्या किंमती वाढणार

नव्या वर्षात  एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि अन्य होम अप्लायंसेसच्या किंमती जवळपास 10 टक्के वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे प्लॅस्टिक महागले आहे. याचा होम अप्लायंसेसच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com