Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zomato support for 6000 handicapped in Pune district

Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

sakal_logo
By
ओमकार वाबळे

झोमॅटो या फूड अॅग्रिगेटर कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कंपनीने अमेरिका (US), इंग्लंड (UK), सिंगापूर आणि आता लेबनॉनसह जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय व्यवसायांमध्ये माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

झोमॅटो संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) फूड अॅग्रिगेटर हा व्यवसाय सुरू ठेवणार आहे. मात्र, यापुढे फूड डिलिव्हरी आणि हॉटेल्समधील गुंतवणूक काढून घेणार आहे.

झोमॅटोचे मुख्य कार्यकारी दिपंदर गोयल यांनी मोठी घोषणा करत लेबनॉनमधील कामकाजही बंद करत असल्याचं सांगितलं. हा एकमेव आंतरराष्ट्रीय व्यवसाय उरला असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या झोमॅटो यूएईमध्ये डायनिंग ऑपरेशन्स सांभाळत आहे. मात्र, मागील वर्षी उर्वरित बिझनेस बंद केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

झोमॅटोने 10 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या त्रैमासिक वित्तीय विवरणानुसार अहवाल करण्यायोग्य तीन विभागात विस्तार केला आहे. त्याचं भौगौलिकदृष्ट्या विभाजन झालं आहे. त्यानुसार सध्या झोमॅटो भारत, यूएई आणि अन्य 13 देशांमध्ये सेवा पुरवते. माज्ञ यातील काही सेवा बंद करण्याचा निर्णय झोमॅटोने घेतला आहे.

झोमॅटो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि झोमॅटो आयर्लंड लिमिटेड (लेबनॉन शाखा, कंपनीने आपल्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की) लेबनॉनची बाजारपेठ बंद केल्याने कंपनीच्या निलंबनाची सुरुवात झाली आहे.

कंपनीने सिंगापूरमधील झोमॅटो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (ZMPL), यूकेमधील झोमॅटो यूके लिमिटेड (ZUL) आणि यूएसची उपकंपनी नेक्स्टटेबल इंक देखील गेल्या तिमाहीत बंद केल्या आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, हा Zomato च्या “क्लीन अप ड्राइव्ह” चा एक भाग आहे. युएई ही सध्या झोमॅटोसाठी एकमात्र फायदेशीर बाजारपेठ आहे, अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली.

कंपनीसमोरील आव्हाने काय आहेत?

आता आव्हानांचा विचार करायचा झाला, तर आजपर्यंत कंपनीने भक्कमपणे आपल्या व्यवसायाचे जाळे पसरवले आहे. सध्या फक्त ‘स्विगी’ त्यांच्या स्पर्धेत उभी आहे. परंतु, आगामी काळात अॅमेझॉन आणि रिलायन्स या क्षेत्रात उतरणार आहेत. अशावेळी सतत नवनवीन कल्पना अमलात आणूनच व्यवसाय तग धरू शकेल. प्रमुख शहरांमध्ये कंपनीचा व्यवसाय स्थिरावला आहे. त्यामुळे अधिक ग्राहकांना आपल्याकडे वळवायचे असेल, तर अधिकाधिक सवलत त्यांना द्यावी लागेल; ज्यामुळे उत्पन्न, नफा यांवर विपरीत परिणाम होऊ शकेल. तसेच कंपनीमध्ये प्रवर्तकांचा भागहिस्सा नगण्य आहे, ज्यामुळे ‘SKIN IN THE GAME’ नाही, असे म्हणावे लागेल.

कंपनीविषयी ही माहिती वाचली का?

२०१० मध्ये स्थापन झालेली ‘झोमॅटो’ ही कंपनी एक ऑनलाईन फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्मचे काम करते. थोडक्यात हॉटेल आणि ग्राहक यांच्यामधील दुवा बनून ग्राहकांपर्यंत हॉटेलचे खाद्यपदार्थ पोचविणे, हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. या व्यतिरिक्त हॉटेलचे डायनिंग बुकिंग, हायपरप्युअर(B2B), झोमॅटोप्रो अशा बाकीच्या सेगमेंट्समध्ये कंपनी काम करते. मागील दोन वर्षांमध्ये ‘कोविड’च्या महासाथीमुळे कंपनीच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली. सुमारे १,१३,२३३ हॉटेल आणि १,६१,६३७ डिलिव्हरी पार्टनरशी कंपनी संलग्न आहे. यावरून तिच्या व्याप्तीचा अंदाज यावा.

loading image
go to top