सताड डोळ्यांनी ओसाड जमीन पाहताना...

सचिन बडे
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

माणसाच्या या अघोरी विकासाने पर्यावरणामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे. पर्यावरणाच्या या बदलत्या चक्राचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि यांच्या सिमेलगतच्या अन्य महाराष्ट्रात जबर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली दिसेल. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला तर, कपाशीवर लाली बोंड आळी पडली. त्यामुळे मातीत घातलेल्या खता-बियांचे पैसेही हाती आले नाहीत. त्यातच पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. परिणामी राज्यात ऊसाची विक्रमी लागवड झाली. नवीन ऊस लागवडी खाली आलेल्या क्षेत्रामेध्ये बीड प्रथम क्रमांकावर होता. तर, मराठवाड्यातील अन्य काही जिल्हे अग्रेसर होती. या ऊसालाही हुमणी रोगाची लागण झाली आणि ऊसातूनही गोडवा निघून गेला.

कोणताही व्यवसायिक धंदा परवडत नसले तर, तो करत नाही. पण, शेतकरी असा एकमेव घटक आहे, जो कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी, आपल्या मातीशी इमान राखत काळ्या आईला सोडत नाही.

माणसाच्या या अघोरी विकासाने पर्यावरणामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे. पर्यावरणाच्या या बदलत्या चक्राचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि यांच्या सिमेलगतच्या अन्य महाराष्ट्रात जबर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली दिसेल. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला तर, कपाशीवर लाली बोंड आळी पडली. त्यामुळे मातीत घातलेल्या खता-बियांचे पैसेही हाती आले नाहीत. त्यातच पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. परिणामी राज्यात ऊसाची विक्रमी लागवड झाली. नवीन ऊस लागवडी खाली आलेल्या क्षेत्रामेध्ये बीड प्रथम क्रमांकावर होता. तर, मराठवाड्यातील अन्य काही जिल्हे अग्रेसर होती. या ऊसालाही हुमणी रोगाची लागण झाली आणि ऊसातूनही गोडवा निघून गेला.

यावर्षी शेतकऱ्यांनी अपूऱ्या पावसावर खरीपाची पेरणी केली. पण, पुढे पाऊसच झाला नाही. त्यामुळे ते पीक मातीतच गेलं. रब्बी हंगाम सुरु होण्याअगोदरच संपलायं. नजर जाईल तिथपर्यंत जळून गेलेली पीक अन् ओसाड जमिनी, बकाल पडलेली माळराण दिसतायेत. हातातोंडाशी आलेली पीकं जळनू जातांना शेतकऱ्याला होणाऱ्या वेदना एसीत बसून समजणार नाहीत.

मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने बहूतांश शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केलेली होती. मात्र, आता पाण्याअभावी हे पीक जळून गेलं आहे. त्याबरोबर त्यांची स्वप्नेही...सध्या गावोगावी स्मशाण शांतता पसरलेली आहे. बहूतांश शेतकऱ्यांनी दावणीची गुरे जगवण्यासाठी अन् पोटाची आग विझवण्यासाठी कारखाण्यांची वाट धरलेली आहे. (ऊसतोडणी मजूरांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी 30 ते 35 टक्यांनी वाढ झाली आहे.) सरकारी मदत म्हणजे निव्वळ गाजरच आहे. हे खरं वाटतयं. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या 'पंतप्रधान पीक विमा योजनेत देखिल भ्रष्टाचार होत आहे. याबाबत जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी राफेल विमान घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा या योजनेमध्ये झाला असल्याचा आरोप केला आहे. (एका जिल्ह्यासाठी सरासरी 175 कोटी विम्याची रक्कम येते. त्यापैकी सरासरी 30 कोटीचे विम्याचे शेतकऱ्यास वाटप केले गेले.) 

एकंदरीतच बदलते पर्यावरण, दुर्लक्ष करणारे सरकार, खते-बीयानातून लूटणाऱ्या कंपन्या आणि पडलेले बाजार भाव अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी पुर्णतःहा नष्ट होत चालला आहे. सध्या सर्वत्र ओसाड पडलेली जमिन अन् जळलेली पीकं आहेत. एका वर्षाच्या दुष्काळाने खते-बीयाने मातीत जाणं म्हणजे, पुढचे तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होणं होयं. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, गेल्या साठ वर्षात भारताचा 'इंडिया' झाला. पण, शेतकरी जसा होता तसाच राहिला. याला त्याच्यासह सर्वच दोषी आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी असो वा दसरा कोणताही सण कधी "हॅप्पी" झालेलाच नाही. पण, तुम्हा सर्वांना "हॅप्पी दिवाली"...

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या