रवीशकुमार :कलाकार माइक और उसूलों का।

पूजा ढेरिंगे
Friday, 2 August 2019

दोन वर्षांपूर्वी पत्रकारिता शिकायला सुरुवात केली होती. हे दोन वर्षाचं शिक्षण तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पारंगत करण्याचा प्रयत्न असतो. पत्रकारिता शिकतेय म्हणजे बातमीदार होणं किंवा टीव्हीवर झळकन एवढंच नसतं, हे मला पत्रकारितेमुळे समजले. त्यामुळे आपला आवाज, आपली पत्रकारिता किंवा आपला चेहरा, आपली पत्रकारिता म्हणण्यापेक्षा आपली भूमिका आपली पत्रकारिता असते.

दोन वर्षांपूर्वी पत्रकारिता शिकायला सुरुवात केली होती. हे दोन वर्षाचं शिक्षण तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पारंगत करण्याचा प्रयत्न असतो. पत्रकारिता शिकतेय म्हणजे बातमीदार होणं किंवा टीव्हीवर झळकणं एवढंच नसतं, हे मला पत्रकारितेमुळे समजले. त्यामुळे आपला आवाज, आपली पत्रकारिता किंवा आपला चेहरा, आपली पत्रकारिता म्हणण्यापेक्षा आपली भूमिका आपली पत्रकारिता असते.

पत्रकारितच्या पदवीसाठी शिक्षण घेणारी पोरं अगदी कोवळी असतात. त्यांना पत्रकारिता म्हणजे लोकमान्य, आगरकर, आंबेडकर, जांभेकरांच्या काळातली वाटते. पण दुर्दैवाने तेही अनेकांना माहीत नसतात. पण तरीही कुठलीच मागासलेपणाची रेषा मनात नसते. कारण, हे दोन वर्ष त्यासाठीच असतात. शून्यापासून सुरुवात करून या ज्ञानशून्य शरीराची नापीक जमीन सुपीक करायची असते. पण वेगळेपण असते. प्रत्येकच गोष्ट अभ्यासण्यासारखी असते आणि प्रत्येक गोष्टीत दडलेला एक गाभा असतो एक खूप काळापासून दडलेला आत्मा असतो, याचा पाठपुरावा या दोन वर्षात होत असतो. 

कारण हि दोन वर्ष म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मनोरंजनात्मक असे बरेच पैलू समोर आणणारे असतात. यातून हळूहळू आपली आवड आपल्याला खुणावत राहते आणि शेवटी एखादा हिरा आपल्या या नापीक जमिनीत रुजू लागतो. रोज खतपाणी मिळाल्यामुळे आणि तारुण्यातील ऊर्जेमुळे नापीक जमीन गुळगुळीत होऊ लागते. जेवढं स्वीकारता येईल स्वीकारू लागतो.

त्याच दिवशी टीव्ही जर्नालिजम शिकवायला बाई येतात. टीव्ही बद्दल कमालीचं आकर्षण हि भारतीयांची एकमताची बाजू.

बाईंनी प्रश्न विचारला, वृत्तवाहिन्यांवर काय पाहता?

आम्ही सगळे सुरु झालो, चला हवा येऊ द्या, रोड़ीइज, नागीण, गाणी, पोगो, क्रिकेट आणि एकजण म्हणाला, रवीश कुमार प्राईम टाइम... 
मला आजही आठवतं तो एकटाच विद्यार्थी होता, जो रविशला प्रत्येक पावलावर फॉलो करत होता...
स्वतःशिवाय दुसऱ्या कुणाचा इतका चाहता होणं मला पटायचं नाही. पण बाईंनी त्याची दाखल घेतली नि रवीशमुळे माझ्यातला हा 'स्व'चा न्यूनगंड नकाबसारखा खाली पाडला.

पत्रकारिता शिकत असल्यामुळे वर्गातच चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, वृत्तवाहिन्यांवरील विशेष स्टोरीज हे बघणं म्हणजे शिक्षणाचा भाग होता. बाईंनी रवीश कुमारचा "प्राईम टाइम" सुरु केला.
आयुष्याच्या एवढया कठीण आणि जबाबदारीमुळे वाकलेल्या प्रत्येक मनुष्याला कुठेनाकुठे आपल्या मूल्यांशी तडजोड करावी लागतेच. पण रवीश कुमार रवीश कुमार राहिला. यात वाटा आणि आधार एनडीटीव्हीचाही होताच. रवीशच्या विश्वासावर आत्मविश्वास दाखवणं तेही या स्पर्धेच्या काळात, हे महत्वाचं होतं... नि प्राईम टाइम सुरु करत, दिल्लीच्या शांत थंडीत एक साधारण आवाज येतो आणि या वातावरणात येणारे ते ठाम शब्द आणि त्या प्रत्येक शब्दाचं महत्व समजावून सांगताना वापरलेले शब्दांचे पीच... म्हणजे मनामनात ठासून राहणारी बातमी होते, नि माणूस चाहता होत जातो रविशच्या सादरीकरणाचा आणि व्यक्तिमत्वाचा...

मग सर्च करून फडशा पडतो रविशच्या असल्या नसल्या सगळ्याच लिखाणाचा... तेव्हाच रवीश माझ्यासारख्या कित्येकांसाठी लिहू लागतो 'नई सडक' ब्लॉग... आणि उलगडू लागते पत्रकारितेचे महत्व! तेही शुद्ध हिंदीत...

भाषा नाही, भूमिका बोलते... त्यामुळे भाषा कमकुवत बनवत नाही. भाषेचा आधार घ्यावा, तिचा गर्व नसावा! याच शैलीत रवीश कुमार स्वतःला पुढे आणत जातो आणि आमच्यासारख्या कित्येक भरकटल्या पोरांना रस्ता दाखवत जातो...

पत्रकारितेच्या याच दोन वर्षात आम्ही मुले सहलीच्या योगाने नव्या दिल्लीतुन रवीश कुमारच्या भेटीला जाऊ लागतो. पण वेळ आमची चुकते आणि रवीश कुमारची भेट हुकते. पण तरीही दुरूनच त्याला स्टुडिओच्या बाहेर उभे राहून बघण्यात आनंद वाटतो. या अनोख्या कलाकाराच्या हातातला माईक पाहून अभिमान वाटतो त्याच्या आवाजाचा... पदोपदी आवाज आणि शब्द यांचं महत्व आणि आदर समजावणारं हा वेगळाच कलाकार लांबून बघण्यात सार्थक वाटतं... 

पत्रकारितेच्या क्षेत्रातील हिडीस, विक्षिप्त आणि अंगावर धावून येण्याचा स्वभाव कुठल्यातरी चंबळच्या खोऱ्यात पुरून रवीश आजही तितक्याच संयमाने आणि जिवंतपणाने न्याय देत त्याच्या क्षेत्राला श्रद्धेने पुढे नेतो... ज्याच्यामुळे हिंदी वाचनाची गोडी लागली या गोडीतून लिखाणाच्या ओंजळीत हिंदी उर्दूचे चार शब्द पडले नि मीही नकळत कधी हिंदी लिहू लागले कळलंही नाही....

गुलझार म्हणतात, "शायर बनने के लिए मोहब्बत की एक मुक्कमल डिग्री चाहिए" 
लेकिन मेरे लिए "ये डिग्री रवीशजी की थी, जो भावनाओंसे लपेटी डिग्री मेरे रूह को लिखने पर मजबूर करती थी |"

तरीही रवीश म्हणतो, तसं कुणाचाच चाहता बनू नका कारण, चाहत्याचा आवाज तुमचा बनेल आणि त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज विसराल. म्हणून आजच्या त्याच्या दिवसासाठी, सगळ्या देशाला अभिमान असणाऱ्या रवीशसाठी ......

'शब्दों से कीचड़ नहीं उठाते' कहता हैं,
मिडिया की खामियोंको भी लिखता हैं,
शब्द से शब्द का मतलब हैं समझाता हैं,
ये शख्स बुझी 'पत्रकारिता'को जिंदादिल जगाता हैं|

रविश एक इंसान नहीं शहर बनता हैं,
जो राजनीति और इंसान की गिरी नीति में 
ढले शब्द की पवित्रता समझाता हैं |

कहते हैं भाषा का आभाव हैं, ये इंसान गांव वाला हैं| 
फिर भी मैं देखती हूँ,
आवाज ये गांव की हैं, लेकिन 'नई सड़क' इसकी शहर में हैं,
कौन इंसान गांव का रास्ता इस बुझदिल शहर तक लाता हैं,
वो 'रवीश' ही होता हैं, जो खुद के उसूलों पर डटे रहकर कामयाबी पाता हैं| 

इतर ब्लॉग्स