Friendship Day Special : लडाखच्या रस्त्यात अडकलेली मैत्री !

पूजा ढेरिंगे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

स्साला ही दोस्ती नाही, स्वार्थ असतो...
स्साला ही दोस्ती नाही, जीव असतो...
स्साला ही दोस्ती नाही, शरीर असतं...
स्साला ही दोस्ती नाही, श्वास असतो..
स्साला ही दोस्ती नाही, बाप असतो...
म्हणूनच ही दोस्ती कुठल्याच बंधनात न बसता प्रत्येक नात्याची कमी पूर्ण करणारं वरदान असतं ...

दोस्त ....
म्हणे दोस्त...
नीट बघा बरं दोघांना... दोस्त दिसता का हो ते ?
"त्यातला एक तुम्हाला बाप वाटेल आणि दुसरा त्या बापाने दत्तक घेतलेला मुलगा..."
याव्यतिरिक्त,
तुम्ही लोकं वेडे असतात त्यांना मित्र म्हणतात...

"दोस्त कभी सस्ता नहीं होता...
मी गेल्यावर माझी किंमत कळेल, यापेक्षा दोस्त असतानाची किंमत कैकपटींनी जास्त असते. तेव्हा त्याची किंमत ठेवा."!
कारण मित्राला गृहीत धरणं, मोठी चुक असते ... मीही केली होती अशी चूक... 
त्यावरच गोष्ट आहे...

मित्र होतो आम्ही दोघे, तीव्र जिवाला जीव देणारे ... काजोल शाहरुखच्या कुछ कुछ होता है टाईप.... 
एकमेकांशिवाय कॉलेजचा एक दिवस जगलो नव्हतो. कॉलेज संपलं आणि मैत्री...?
पावसाळ्याचे दिवस चालू होते...

बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. टेलिव्हिजनवर बातम्या चालू होत्या. आम्ही दोघे आमच्या कॉलेज दिवसातले किस्से रंगवत होतो. दिवस तो 3 ऑगस्ट होता, बर्रोबर मागच्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो...

आजच्या दिवशीही मौसम, कुदरत सगळं इतकं सुंदर जुळून आलं होतं. यावर्षीही मी वाट पाहत होते तो मला म्हणेल 'चले?'
आणि आश्चर्य, तो अर्ध वाक्य म्हणायला आलाच मी "ऑफ कोर्स एस्स" ... म्हणून पूर्ण केलं.
आणि क्षणही न दवडता आम्ही गाडी, कपडे, पैसे, दोरी, कॅमरा आणि एक हरवलेली मुस्कुराहट घेऊन लग्गेच निघालो ...
वातावरण बाप झालं होतं...

वातावरणात मैत्रीचा गंध पसरला होता... 
त्यामुळे "यारी पें हमारे कुछ जादा ही प्यार आ राहा था|"

लडाख म्हणजे आमची यारी होती.
जिच्यात प्रचंड ओढ होती आणि प्रत्येकाच्या आयुष्यातलं ते स्वप्न, फक्त माझ्या वाट्याला येऊन पूर्ण होत होतं, तेही प्रत्येक फ्रेंडशिपडेच्या दिवशी..! 
एकमेकांना नकळत दिलेलं ते प्रोमिसच होतं, "कोणी मरत जरी असेल तरी फ्रेंडशिपडे पुढे ढकलला जाणार नाही. भेटायचं म्हणजे भेटायचंच. फिक्सच!."
ठरल्याप्रमाणे निघालो आम्ही.

जुने किस्से पुन्हा आठवत, कॉलेजमधल्या पिंकी चिंकीला आठवत, पहिल्या प्रेमाच्या, पहिल्या ब्रेकअपला शिव्या घालत, हळूच 'एखादा हॅंडसम मुलगा ओवर्टेक करून गेला की त्याच्यावर मी लाइन मारत आणि सुंदरशी मुलगी गाडी चालवत गेली की त्याला दाखवत' आम्ही आमचे दिवस पुन्हा आणून जगत होतो. 

हा आनंद वर्षभरात मी वेड्यासारखा मिस्स केला होता... आयुष्याच्या गर्तेत हा फुकटचा, होममेड आनंद मी विसरूनच गेले होते. पैसा करीअरच्या घाईत मी माझा आनंदच दावणीला लावलेला होता. आज भेटणं कशापेक्षाही जास्त महत्वाचं होतं... नाहीतर पुढे होणार होतं ते कसं झालं असतं?

तसं मध्ये एक वर्षाचा गॅप गेला होता. आमचा एकमेकांशी कॉंटॅक्ट झालेला नव्हता. तरी आज भेटलो होतो आम्ही. आम्ही भेटलो तेव्हा या मधल्या एका वर्षाबद्दल टेलिपथीने ठरवलंच असावं की "मधल्या काळात काय झालं हे गौण आहे कारण आजचा दिवस आपला आहे. ते आपण सगळ नंतर बोलूया. काय भांडायचं नंतर भांडूया..."

या'नंतर'च्या भरवशावर आम्ही लडाखच्या दिशेने जाऊ लागलो. दोघे कधी शून्यात विचार करू लागले तर कधी उगाचच काहीतरी विषय काढू लागले. याच विचारांमध्ये असताना आमच्या प्रवासात एक पूल आला, त्यावर खड्डे जमले होते. बाहेर बेधडक पाऊस कोसळत होता... 

मागच्यावेळी हेच खड्डे आम्ही "चल डरपोक , हम हम हैं, जायें या नहीं जायें? हम नहीं सोचतें. चल एक जान होकर पार करते है।..."
पण यावेळी तो त्याचं तो पुढे गेला, मी माझं...
आणि अर्ध्यात तो पूल एक दोरी निसटून खाली कोसळला...आणि ... आणि क्षणात काय झालं माझ्या डोळ्यासमोर कळलंच नाही. श्वास लिटरली अडकले होते...
यावेळी वेगवेगळे गेलो म्हणून मी मरणार होते...

'मेरी यारी मुझ में जान भी डालती है।' हे मला त्या क्षणी कळत होतं. माझं भानच गेलं होतं... 
हे घडणं प्लॅन नव्हतं मग असं कसं घडत होतं, मी घाबरून गेले होते. तितक्यात तो मागून जिवाच्या आकांताने ओरडायला लागला होता, "हर्रामीsssss, कित्ती मिस्स केलंय तुला कल्पना नाहीये भूता आणि त्याचा बदला मला लडाखला पोहोचून घ्यायचाय, तुला वाचायचंय कळतंय का... तु ब्रेव्ह गर्ल आहेस. धीर सोडू नको. नाहीतर मी दुसरा मित्र कुठून शोधू?" ... ते ऐकून जागी होऊन मी पुन्हा भानावर आले.
आणि म्हणाले, "शोधूनही मिळेल काळ्या?" मला या परिस्थितीतपण त्याचा राग आला होता. माझी रिप्लेसमेंट मला नकोचे. तो करणारही नाहीये खात्री असून त्याची गच्ची पकडून त्याला जाब विचारायचा म्हणून तरी मला वाचायचं होतं... 

एका हाताने त्या पुलाची सुटलेली दोरी घट्ट पकडली. मोठय़ाने श्वास घेतला पण त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं, ते डोळे सुसरासारखे मोठ्ठे झाले होते ... मरणाच्या दारात मी उभी होते पण जीव त्याचा अर्ध्यात येऊन पडला होता...

त्याचा तो थरकाप, माझ्याप्रतीचं प्रेम पार डोळ्यातून बाहेर आलं होतं पहिल्यांदा ... त्याच्या डोळ्यात "मला रहायचंय तुझ्याबरोबर आयुष्यभरासाठी, कधीही न सोडण्यासाठी...." दिसत होतं... हे मी त्या चार भिंतीच्या आत कोंदटलेल्या ऑफीसात मिस्स केलं होतं...

तो घाई करत, लांबवर हाताची लांबी वाढवत मला पकडण्याचा प्रयत्न करू लागला.
अखेर त्याच्या हातात माझ्या हातात पडला तेव्हा खात्री झाली, आता मरत नसते मी .... तेव्हा रागाने हसून त्याच्याकडे पाहीलं आणि " यारर्र सॉरी यारर्र्रsssssss..... का कस माहिती नाही पण तुला गृहीत धरू लागले होते... हे एवढे दिवस तुझ्याविना राहणं म्हणजे माझ्यातली मीच शिल्लक राहिली नव्हते... मला जगायचंय" म्हटलं
..
"एएएएएएssss बाई, नंतर लेक्चर झाड ना... मरायवर आलीयययय इथे... आधी बाहेर निघ इथून फिल्मी कुठली... " तो विव्हळत होता..
आणि आरडाओरडा करून, आरोळ्या देउन लोकांची मदत मागत होता. शेवटी कुणाची वाट न पाहता, एका ठिकाणी खरचटवून का असेना, त्याने मला रस्सीने व्यवस्थित बाहेर काढून एका सुरक्षित जागी ठेवलं होतं, माझ्या हक्काच्या मिठीत...! त्याचा जीव माझ्यात परत आला होता ... मला माझ्यात जीव जाणवायला लागला होता....
तेव्हा मला कळलं होतं जीव जाणं काय असतं आणि आपला जीव जाताना दुसऱ्या कुणाचा जीव जात असतो ते काय असतं.... आणि हाच तो हरामी एका अशाच क्षणी आपला होतो आयुष्यभरासाठी!!!

पण या घटनेमुळे, तिथे तो माझा बाप झाला होता...असा बाप जो माझ्यासाठी धडपड करत होता, ज्याला त्याच्या मुलाला जगवायचं होतं, वाढवायचं होतं. ज्याचे त्याला सगळे लाड पुरवायचे होते. ज्याला माझ्यावर निस्वार्थ प्रेम करायचं होतं, जो माझ्या यशावर न जळणारा एकमेव प्राणी असतो या पृथ्वीवर... त्यावेळी मला कळलं होतं तो त्याच्यातल्या मला कधी मरू देणार नव्हता मला कळलं होतं.... आणि म्हणून दोस्ती म्हणजे 'एकच व्यक्ती असते जेव्हा शोलेचं ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, यारों दोस्ती बडी ही हसीन, मेरी जिंदगी सवारी म्हणत जो गडी कुठल्याही गडबडीशिवाय तुमच्या शेजरी येतो तो हा व्यक्ती असतो .."

स्साला ही दोस्ती नाही, स्वार्थ असतो...
स्साला ही दोस्ती नाही, जीव असतो...
स्साला ही दोस्ती नाही, शरीर असतं...
स्साला ही दोस्ती नाही, श्वास असतो..
स्साला ही दोस्ती नाही, बाप असतो...
म्हणूनच ही दोस्ती कुठल्याच बंधनात न बसता प्रत्येक नात्याची कमी पूर्ण करणारं वरदान असतं...

इतर ब्लॉग्स