article_370
article_370

काश्मीर हा मुळात "प्रश्न" का आहे?

अभ्यासात खुप व्यस्त होते. पण घरच्यांनी लावलेल्या टिव्हीचा आवाज कानावर पडत होता. काश्मीर प्रश्न, कलम 370 अस सगळ ऐकु येत होत. कलम फक्त वकिलांना माहित असतात, आम्ही इतक अवघड लक्षात ठेऊ शकत नाही अशी आमची कारणं. ते सारख ऐकुन शेवटी मी फोन हातात घेतला आणि गुगल केल. वाचल्यावर माझ्या लक्षात अस आलं कि जे आजवर आम्हाला बोलुन माहित होत ते लिहुन देखील ठेवलय. अर्थात ते सहाजीक होतच, पण बाकीच्यांप्रमाणे मीही कधी याचा इतका विचार नव्हता केला. फार मागासलेपणा जाणवला मला. पण ठिक आहे मी त्यानंतर न्युज बघायला गेले. आणि टिव्ही वर तो सगळा गोंधळ बघत असताना माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. 

काश्मीर हा मुळात "प्रश्न" का आहे? कोणताही प्रांत हा प्रश्नचिन्हावर कसा थांबवलेला असु शकतो. तिथल्या लोकांना उत्तराची अपेक्षा असेलच ना. आणि जे-जे लोक या काश्मीर प्रश्नावर भाष्य करू पाहत आहेत, ते जगलेत आहेत का बंदुकिच्या भितीत दडलेल आयुष्य. आणि आज जर त्या प्रांतामधल्या लोकांना थोडे हक्क मिळतायेत तर पुन्हा प्रश्न का? ऐरवी प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर देणारे आपण, एका प्रांताला प्रश्नचिन्हात कसे बांधु शकतो. आपण सतत आपल्या चिंतेच, दु:खाच, व्यथांच किती भांडवल करतो, त्यातच गुरफटलेल असतो. पण आपल्याला नाही रोज दहशतीशी लढाव लागत. रोज स्वत:च्या जीवन आणि मृत्युची काळजी आपल्याला नाही करावी लागत.

अहो, आपल्याला आपल्या अस्तित्वाचे प्रश्न नाही छळत. ना रोज कसली भिती असते, न आपल्यावर सतत कोणाची नजर असते. कोणी सतत बघत नसतं आपल्याला, सतत कोणाच्या नजरेत आपल्या बद्दल हाव दिसत नाही. ना ओरबाडुन, ना बळाचा वापर करुन कोणालाही आपण, आपली जागा, आपल गाव, शहर काही- काही नको असत. आपला परिवार, आपले मित्र- मैत्रीणी यांची चिंता सतत नाही आपल्याला छळत. बाहेर गेलेल्या माणसाची वाट आपल्याला नाही पाहावी लागत. कोणी सतत आपल्याला चर्चेचा विषय नाही बनवत आणि इतकी चर्चा करुन कोणी आपल्याला दुर्लक्षित नाही करत. नाही टाळत कोणी आपल्याला इतक, आपल्याला वर्षानुवर्षे आपल्याला प्रश्नात बांधुन नाही ठेवत, आपल्या प्रश्नांच्या उत्तरांना कोणी नाही डावलत ना कोणी विरोध करत.

मला काय वाटत माहिती का, नाही भोगल आपण हे सगळ. हेच कारण आहे आपल्याला त्याची किंमत न असण्याचं. कुठुन आणुयात आता किंमत, विकत मिळते का? कारण आमचा भर खरेदी वर खुप आहे. मग ती कुठे जागा का असेना. 

आणि जर आज काश्मीर प्रश्नाचं उत्तर कोणी लिहीतय तर का त्याच्या लिखाणात इतके अडथळे यावे. मी पुन्हा अभ्यासाला बसुच शकले नाही, कारण मला नाही लिहायची उत्तर या पुस्तकी प्रश्नांची. कारण मला आता अस दिसतय की प्रश्नांना उत्तर नसल तरी सगळ्यांच भागतय. ना कोणाला प्रश्नाशी घेण देण आहे, ना प्रश्नात अडकलेल्यांशी.

अहो, आम्ही आहोत खुश, मग अजुन काय हवय! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com