जागतिक हदय दिन-हार्ट ब्लॉकेज : अँजिओग्राफीच्या पण पलिकडे ! 

residentional photo
residentional photo


हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याला कोरोनरी आर्टरी डिसिझ (सीएडी) असं संबोधले जाते. आतापर्यंत हृदयांच्या रक्त वाहिनीच्या ब्लॉकेजला बघण्याचा एकच विकल्प होता आणि तो म्हणजे अँजिओग्राफी. आता काही नवीन तंत्रज्ञान आणि इमेजिंग टूल्स जसं कि फ्रॅक्‍शनल फ्लो रिझर्व्ह (एफएफआर) आणि इंट्रावास्क्‍यूलर इमेजिंग, यांच्याद्वारे हृदयाच्या ब्लॉक्‍सच्या उपचारांमध्ये नवीन दिशा मिळालेली आहे आणि हे तंत्रज्ञान हृदय रूग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञान- इंट्राकोरोनरी प्रेशर रेकॉर्डींग अँन्ड इंट्रवेसकूलर इमेजिंगचा त्यासाठी उपयोग केला जातो...! 

    फ्रॅक्‍शन फ्लो रिझर्व्ह (एफएफआर)... हार्ट ब्लॉक असलेल्या रूग्णांसाठी एक चांगली बातमी आहे कि प्रत्येक ब्लॉकला ओपन-हार्ट सर्जरी किंवा अँजिओप्लास्टींची आवश्‍यकता नसते. मग कसं ठरवायचं कि हा ब्लॉक त्रास देणारा आहे की नाही? ब्लॉकला अँजिओप्लास्टी करून काही फायदा होणार आहे नाही? 
अँजिओप्लास्टीने आपण ब्लॉकेज बघतो, पण त्या ब्लॉकेजने खरंच हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो की नाही हे सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत कोणताच रामबाण उपाय नव्हता. आतापर्यंत आपण स्ट्रेस टेस्टद्वारे हे ठरवायचो की एखाद्या ब्लॉकला अँजिओप्लास्टीची गरज आहे की नाही, पण या टेस्टच्या बऱ्याच मर्यादा आहेत. 
फ्रॅक्‍शनल फ्लो रिझर्व्ह (एफएफआर) हा एक नवीन अत्याधुनिक अविष्कार आहे. ज्याने हा प्रश्‍न संपुष्टात आलेला आहे. हदयाचा रक्त वाहिनी मधला (इंट्रा कोरोनरी) दाब(प्रेशर) आणि प्रवाह मोजून हि प्रणाली माहिती देते की ब्लॉकेज त्रास देणारा आहे की नाही. एफएफआर हा नवीन तंत्रज्ञान अतिशय लोकप्रिय होत चाललेला आहे. ही एक अत्यंत वैज्ञानिक आणि पुरावा संपन्न पध्दती आहे. ज्याद्वारे अनावश्‍यक अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रीया टाळणे शक्‍य झालं आहे. 
एफएफआर प्रणालीमध्ये,एक विशिष्ट तार(वायर) ज्यांच्यामध्ये एक प्रेशर सेन्सर असतो. तो रक्त वाहिनीच्या आता ठेवण्यात येतो. या प्रेशर सेन्सरद्वारे ब्लॉकच्या पहिलं आणि प्लॉकच्या नंतरचं प्रेशर(दाब) मोजण्यात येतं. जर एखादा ब्लॉक जास्त नसेल तर त्यांच्या दोन्ही बाजूंचे प्रेशर(दाब) मध्ये जास्त अंतर नसते. जर दोन्ही बाजूचे प्रेशर सारखे असले तर त्याचा एफएफआर एक असतो. जसं जसं ब्लॉक वाढतो. ब्लॉंकच्या पलिकडचा प्रेशर कमी होतो आणि एफएफआर कमी होत जातो. एफएफआर 0.80 चा अर्थ आहे की ब्लॉक इतका जास्त आहे की त्यांच्यामुळे हदयाला वीस टक्के रक्त पुरवठा कमी होतं आहे. ज्याचं एफएफआर 0.80 पेक्षा कमी आहे त्यालाच ऍजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज असते आणि ज्यांचा एफएफआर 0.80 पेक्षा जास्त आहे. त्याचं फक्त औषधोपचारद्वारे उपचार करण्यात येऊ शकतं. ब्लॉकेजचा एफएफआर मोजून आपण अनावश्‍यक अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रीया टाळू शकतो. 
-- 
इंट्रावास्क्‍यूलर इमेंजिग ) ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी,ओ.सी.टी- हदयरोगाच्या संदर्भातील आणखी एक नवीन तंत्रज्ञान ज्याने हदयाच्या रक्त वाहिनीच्या ब्लॉकेजला बघण्याचा आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला आहे. ते म्हणजे इंट्रावास्क्‍यूलर इमेजिंग, अँजिओग्राफी आपल्याला रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकला फक्त बाहेरून बघण्यात मदत करते,पण ही नवीन इमेजिंग तंत्र आपल्याला रक्तवाहिन्यांच्या आतून प्रतिमा काढण्यास आणि ब्लॉकची तीव्रता समजण्यास मदत करते. 
अलिकडेच,ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी (ओसीटी) जी कि एक अत्यंत उच्च रिझोल्यूशनची ऑप्टिकल इमेजिंग तंत्र आहे. त्याला अमरिकेच्या फूड आणि ड्रग्ज अँडमिनिस्ट्रेशन(एफडीए) द्वारा क्‍लिनिकल वापरासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे. ओसीटी इन्फ्रा-रेड प्रकाशाचा वापर करून आपल्याला हदयाच्या रक्तवाहिनीला आतून अतिशय सुक्ष्मदृष्टीने बघण्यात मदत करते. ओसीटीद्वारा आपण रक्तवाहिनीच्या ब्लॉकचे वैशिष्ट्य जाणून घेऊ शकतो,जसं कि हे ब्लॉक कशाने बनले आहेत, कोलेस्ट्रेरॉलने? कॅल्शिअमने? किंवा रक्ताच्या गुठळीने? ओसीटी द्वारा रक्तवाहिनीतल्या आतल्या थर ज्याला एन्डोथेलीम म्हणण्यात येतो, यात चीर तर पडली नाही, त्याचा शोध घेण्यात येऊ शकतो. 
सगळ्यात महत्वाचं,ओसीटीद्वारे आपण हे ठरवू शकतो कि एखाद्या रक्तवाहिनीमद्ये किती लांबीचा आणि किती रूंदीचा स्टेण्ट वापरायला पाहिजे आणि हे जाणून घेऊ शकतो कि स्टेण्ट चांगल्या प्रकारे बसविण्यात आलेला आहे की नाही. भारताची सध्याची परिस्थिती पाहता अशा उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची अतिशय गरज आहे. ज्यामुळे आपण गुंतागुंत टाळून रूग्णांला अधिक उत्तम उपचार देऊ शकतो. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com