लगते थे जो बुझाने वाले, वही लगा रहें है आग!

What will happen after CAA and NCR implements in Country article by Harshada Kotwal.jpg
What will happen after CAA and NCR implements in Country article by Harshada Kotwal.jpg

शहर दर शहर लग रही ये आग, 
किसी के बस की नही ये आग.

लगते थे जो बुझाने वाले,
वही लगा रहें है आग.

घी जैसे हे मंत्री,
और भडकाएंगे ये आग. 

थोडी आवाज तुम भू उठाओ, 
के वापस कभी ना लगे ये आग. 
(कविता- @theoshoprojekt)


हे आपले पंतप्रधान आहेत, देशाला मोठी अर्थव्यवस्था बनवतीलही कदाचित, पण त्याचवेळी तुम्हा आम्ही सर्वांच्या कोऱ्या करकरीत नवीन कपड्यांवर रक्तांचे डाग नक्कीच असणार. कारण, ''Those who are creating voilence can be identified by their clothes.''

तज्ञांच्या मते नागरिकत्व कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. संविधानातील 14, 15 आणि 21 या नागरीकत्वासंदर्भातील कोणत्याही कलमांचे हा कायदा उल्लंघन करत नाही. सगळं मान्य. तरीही सर्वांत आधी CAA (Citizen Amendment Bill आताचे CAA Citizen Amendment Act) आणि NCR (National Refister of Citizens) हे दोन्ही मिळून घटनेच्या मुलभूत कलमांवर घाला घालतील, अशी भीती आहे. ती कशी ते बघूयात. तुम्हाला वाटतं असले की तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला या देशात काहीच होणार नाही..तर असं नाहीय. CAA नंतर आता देशात NCR लागू होईल आणि तुमच्या आमच्यासारखे लाखो हिंदू स्वत:चं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लाईनमध्ये उभे राहणार आहोत. 

एका वृत्तवाहिनीवर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर चर्चा सुरु असताना आपला पक्ष किंवा देश मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचे भाजपचा प्रवक्ता ठासून सांगत होता. त्यानं उदाहरणही खूप भारी दिलं. तो म्हणाला, 2015 मध्ये नाही का आपण अदनान सामीला देशाचं नागरिकत्व दिलं...? 

आणि मला प्रचंड हसायला आलं. लंडनमध्ये जन्मलेल्या श्रीमंत, प्रसिद्ध पाकिस्तानी नागरिकांची मला काळजी नाही. मला काळजी आहे ती माझ्या
देशवासियांची. मग ते हिंदू असोत, मुस्लिम की आणखी कोणत्या धर्माचे आणि सर्वाधिक काळजी गरिब आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नाही अशा लोकांशी. 

CAA आणि NCR एकत्रितपणे का भीती निर्माण करताहेत...? आता बघा, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत इतर देशातील मुस्लिम वगळता सर्व
स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार. देशात लवकरच NCR लागू होणार आहे. त्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला आपण स्थलांतरित नसून भारतीय आहोत हे सिद्ध करावे लागेल. कसं करणार हे सिद्ध? ओळखपत्र दाखवून?, टॅक्स पावती दाखवून? नाही तर, आपले पूर्वज इथे राहिले, जन्मले हे सिद्ध करुन. सरकार एक कट ऑफ वर्ष ठरविणार, या वर्षापासून तुमचे पूर्वज देशात राहिले, जन्मले याची कागदपत्रं दाखवून तुमचं नागरिकत्व सिद्ध केलं जाणार. हे सर्वांत अवघड आहे कारण आपल्या देशात कागदपत्र कधीच नीट ठेवली जात नाहीत. तब्बल 60 वर्षांपूर्वीची कागदपत्रं शोधणं जी कदाचित जळून गेली असतील, पूरात वाहून गेली असतील हे प्रचंड अवघड आहे. 

पण मग CAA आणि NCR एकत्र आल्यावर काय होणार बघा...

तुम्ही हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन असाल आणि तुम्हाला कागदपत्रं सापडत नसतील तर तुम्ही स्थलांतरीत म्हणून घोषित होणार. मात्र, CAA मुळं तुम्हाला देशाचं नागरिकत्व मिळणार. मात्र, जर तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्ही सगळे हक्क एका क्षणात गमावून बसता. आता तुमच्याकडे राहायला जागा नाही, मतदानाचा हक्क नाही, तुम्ही या देशाचे नागरिकही नाही. तुम्हाला नोकरी करण्याचा अधिकार नाही आणि पासपोर्ट नसल्याने देशही सोडून जाता येणार नाही. पण काळजी नको, आमचं दिलदार सरकार अशा सर्वांसाठी डिटेंशन कॅम्प उभे करणार आहे आणि त्यांत यांच्या राहण्याची सोय करणार आहे. 

दिल्लीमध्ये सध्या या सगळ्यांवरुन जे सुरु आहे ते भयानक आहे. आपल्यापर्यंत दिल्लीतील प्रत्येक गोष्ट पोहोचतीये कारण दिल्लीतील इंटरनेटसेवा सुरु आहे. ज्या राज्यात इंटरनेटसेवा बंद आहे त्यांचं काय? हो, मुलं चुकली! त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारणे चुकीचे आहे. पण आपल्याला हे का कळत नाही की जेव्हा सरकार मुलांना त्यांच्या हातातलं खेळणं बनवतं तेव्हा असे आंदोलक हिंसक मार्ग स्वीकारण्याचीच शक्यता जास्त असते. आपण इथं बसून म्हणतो की या विद्यापीठांच्या मुलांना CAA आणि NCR नक्की कळालचं नाहीये...अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे का की तुम्हाला कळालंय? छान मला तुमच्या आत्मविश्वासाचं कौतुक आहे. आता तर या मुलांनी कोणत्याही प्रकरची तोडफोड केली नसल्याचेही पोलिसांनी मान्य केले आहे. तरीही दिल्ली पोलिस त्यांच्या विद्यापीठात घुसून त्यांना मारहाण करत आहेत. जामिया मीलिया विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठात घूसून पोलिसांनी विद्यार्थांना मारहाण केली आहे. हे कमी म्हणून आता सोशल मीडियावरुन असं पसरत आहे की अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दिल्लीत पोलिसांच्या
वेशात उतरुन विद्यार्थांना मारहाण करत आहेत. 

दिल्लीमध्ये जागोजागी आता विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील पहिला डिटेंशन कॅम्प नवी मुंबईमध्ये असणार अशी घोषणाही झाली आहे. आता शांत बसून चालणार नाही. फक्त तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या शहरात तुम्ही सुरक्षित आहात म्हणजे तुम्ही याविरुद्ध आवाज उठवत नसाल तर हे साफ चुकीचं आहे. बोलते व्हा! नोटबंदी, जीएसटी, कलम 370 प्रत्येकवेळी शांत बसलो आणि आता तेच अंगलट येतंय. आता जर शांत बसलो तर सगळं संपेल. देशात जे चाललंय ते चुकीचं आहे. जमेल त्या पद्धतीने बोलते व्हा. लोकांना जागरुक करा, जे बोलत नाही त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजवा, आंधळा विश्वास अंधभक्ती आता तरी बंद करा. बोलते व्हा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com