आत्मविश्वासाने "कॅशलेस' व्हा!

अतुल कहाते 
Friday, 6 January 2017

कॅशलेस व्यवहार करण्यासाठीची मानसिकता हळूहळू तयार होत असतानाच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्‍यक आहे. बरेचदा लोक अशा प्रकारचा "कॅशलेस' व्यवहार करायला जातात आणि पहिल्या-दुसऱ्या व्यवहारातच काही कारणामुळे फटका सोसावा लागल्यामुळे परत त्या फंदात पडत नाहीत. याविषयी पुरेशी माहिती करून न घेणे किंवा या व्यवहारांसंबंधीची सुरक्षितता न जपणे, ही यामागची मुख्य कारणे असतात. यातून होऊ शकणारे संभाव्य नुकसान अगदी मर्यादित ठेवण्यासाठी काही सोपे उपाय अगदी प्रत्येक जण करू शकतो.

क्रेडिट अथावा डेबिट कार्डाने व्यवहार करताना संबंधित कार्डाची मर्यादा किंवा डेबिट कार्डाच्या खात्याला जोडलेल्या बॅंक खात्यामधील रक्कम अगदी मर्यादित ठेवा. म्हणजेच जरी काही कारणाने आपल्या कार्डाचा एखाद्या भामट्याने गैरवापर केलाच तरी आपले नुकसान त्या रकमेपुरतेच मर्यादित राहील. तसेच "ई-वॉलेट' वापरतानाही त्यात आपल्याला रोजच्या साध्यासुध्या खरेदीसाठी लागते, एवढीच रक्कम ठेवा. यामुळे त्यातून होणारे नुकसानही जास्तीत जास्त त्या रकमेपुरतेच मर्यादित राहील.

मोबिक्विक कंपनीचे "ई-वॉलेट' तर वीस हजार रुपयांपर्यंतचे नुकसान विम्याने भरूनसुद्धा देते. इतरही कंपन्या आपल्या ग्राहकांना अशी सुविधा लवकरच उपलब्ध करून देतील, हे नक्की. आपला स्मार्ट फोन सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला पिन किंवा अनलॉक पॅटर्न ठेवा. आपल्या संगणकाच्या बाबतीतही हे पाऊल उचला. ई-मेल, व्हॉट्‌स ऍप किंवा एसएमएसमधून आलेल्या कोणत्याही मजकुरामधील लिंकवर क्‍लिक करताना विचार करा.

कोणतेही "ऍप' हे अधिकृत ऍप स्टोअरमधूनच डाऊनलोड करा. फुकटचे वायफाय शक्‍यतो वापरू नका. सायबर कॅफेमधून "कॅशलेस' व्यवहार अजिबात करू नका. या "टिप्स'चे तंतोतंत पालन करा आणि अगदी आत्मविश्वासाने सहजपणे "कॅशलेस' व्हा! 
 
इतर ब्लॉग्स