गावगाड्यातील लोहार हा आता फक्त नावापुरताच !

Lohar
Lohar

गावोगावी फिरणं माझा आवडता नाद. असंच फिरत-फिरत मित्राच्या गावात गेलो. मित्राचा मामेभाऊ इंग्रजी माध्यमातून शिकत होता. मी जवळून खेडं बगितलं आहे. “का रे तुला बुलत व बलुतेदार माहित आहेत काय?” तो म्हणाला, म्हणजे काय? त्याच्या प्रतिप्रश्नात नाही हे उत्तर दडलं होतं. बर तुला लोहार तरी माहिती आहे का? तो म्हणाला, CARPENTER सारखं काम करतो. चला म्हटलं, सुताराची तरी ओळख आहे पोराला. आता तर लोहारची तर माहितीचं नसेल, लोहाराच्या ऐरणीच्या ओळख फक्त वर्णमालेतील वर्ण शिकण्यापुरती मर्यादित राहणार असे सगळं चित्र दिसत होतं. शहरात पोटपाण्यासाठी आलेल्या नवीन पिढीला सुतार, लोहार, बलुतेदार ही फक्त नावातूनच माहित असणार. 

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे,
आभाळागत माया तुझी आम्हांवर राहू दे ..!

या अस्सल गाण्यामध्ये ठीपलेला लोहार काळात ओघात अवकाळी पावसासारखी दडी मारत आहे. पण, काळाबरोबर सगळं बदलंत चाललंय, आमच्या गावातील रघु घिसाडी आजही आठवला की सगळं चित्र उभे राहते. शेतकऱ्याला कोणतेही लागणारे साहित्य म्हणजे कुऱ्हाड, कुदळ, खुरपं यांना शेवट्याण्यासाठी आम्ही लहानपणी लोहारकडे जात असू. लाकडाचं काम करणारा सुतार तर लोखंडाचं काम करणारा लोहार (घिसाडी). लोहार व सुतार यांच्या कामात साम्य होते, लोहाराने विळा केला की लाकडी मुठ बसवण्याचे काम सुतार करत असे.
 

येळवस : मातीतला उत्सव

गावगाड्यात अनेक वस्तू दोघांनी मिळून बनवलेल्या असायच्या. शेतीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू बनवून देयाचा काम लोहार करत असे, शेतकरी त्याला लोखंड व भट्टीसाठी लागणारा कोळसा पुरवत असे. याशिवाय हाताखाली एखादा गडीमाणूस देत असे. लोहार प्रामुख्याने नांगराचा फाळ, कुदळ, खुरपे, खोरे, कोयता, हातोडा, विळा, बैलगाडीची धाव, सोनाराची ऐरण, चांभाराची आरी, मुलाण्याची सुरी असं बरंच काही बनवत असे, याशिवाय जुन्या सामानाला डागडुजी करणे, बैलाच्या पायाला नाल बसवणे, हे काम लोहारच करायचा. या सर्व कामासाठी शेतकरी त्याला बलुता द्यायचा. ऐरण, हातोडी आणि भट्टी हे त्याचे दैवतच !

पण, गावगाड्यातील लोहार हे स्वत:ला लोहार मानतच नाहीत, ते स्वत:ला विश्वकर्माचे वंशज मानतात, हे लोक लोहार म्हणून ओळख सांगतात, घिसाडी समाजाच्या स्त्रिया आडवे कुंकू लावतात, तर लोहार समाजातील स्त्रिया गोल कुंकू लावतात.

काळानुसार गाव बदलत आहेत, काळाच्या ओघात त्याचे परंपरेनुसार चालत असलेले व्यवसाय बदलत जात आहेत, गावगाड्यातील लोहाराच्या भट्टीची जागा आता मोठमोठ्या विद्युतचलित भट्टीने घेतली आहे, ऐरण, हातोडा ह्या वस्तू इतिहास जमा होत्यात की काय असं वाटतंय, काळ बदलला या समजातील तरुण पिढी त्याच्या व्यवसायाबाबतीत उदासिन दिसत आहेत. सगळ्या समाजातील पोरं शिकत आहेत. त्यामुळे आपले नवं अस्तिव निर्माण करत आहेत, असं असलं तरी लोहाराच्या ऐरणीला मात्र घरघर लागली आहे. असे एक एक पैलू गावगाड्यामधील सगळं हळूहळू निसटत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com