गोवा, दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या भारताच्या प्रदेशांत पोर्तुगालची तब्बल साडेचारशे वर्षे सत्ता होती. यापैकी बहुतांश काळात या प्रदेशातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
इंग्लंडमध्ये लोकशाहीची जुनी परंपरा आहे, लोकशाहीसाठी तिथल्या लोकांनी फार मोठी किंमत चुकती केली आहे. मात्र याच इंग्लंडने आपल्या साम्राज्यातील वसाहती देशांतील लोकांना मात्र या लोकशाही पद्धतीतील अधिकार आणि हक्क बहाल कधीही केले नव्हते.