Purushottam Puri : अधिक मासात देशभरातील भाविक का देतात बीडच्या पुरूषोत्तम पुरी मंदिराला भेट? जाणून घ्या आख्यायिका 

Adhik Maas
Adhik Maassakal

पुरुषोत्तम पुरी

दीन म्हणोनी कृष्णे उद्धार केला ॥ निज नामे 'पुरुषोत्तम' धन्य तुला केला.

अधिक मास चालू होऊन 8 दिवस उलटले पण तुम्हाला माहीत आहेत का की अधिक मासामध्ये आपल्या महाराष्ट्रात विशेष करून कोणत्या मंदिरात जातात? हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख जरूर वाचा...

महाराष्ट्र हे नेहमीच संस्कृतीला जपणारं, जाणणारं आणि पिढ्यान् पिढ्या चालवत राहणारं राज्य.. या भुमित ज्ञानोबा, तुका, जनाई, बहिणाई, यांसारखे अभंगाचा ठेवा जपणारे थोर संत , तर छत्रपती शिवाजी महाराज यांसारखा प्रजेला जपणारा राजा जन्माला आला.

अधिक मास हा धार्मिकतेने नटलेला महिना म्हणून ओळखला जातो.या महिन्यात मोठ्या प्रमाणात दान धर्म केले जातात. तर धार्मिक ठिकाणी जाण्याचे प्रमाण देखील या महिन्यात जास्त असते.

अधिक महिना हा तीन वर्षांतून एकदा येतो. यावर्षी चा धोंड्याचा महिना थोडा वेगळा आहे अस म्हणायला हरकत नाही. यावेळेस तर दुग्धशर्करा योग म्हणजेच श्रावण. या महिन्याला मुळातच देवाचा महिना मानला जातो. नागपंचमी, ऋषीपंचमी आणि बरंच काही या महिन्यात आपल्याला अनुभवायला मिळते.

विशेष म्हणजे श्रावणी अधिक मास येणं हा योग तब्बल 18 वर्षांतून एकदा आला आहे, असं जाणकारांच म्हणणं आहे. याच निमित्ताने पुरुषोत्तम पुरी या धार्मिक ठिकाणाविषयीची माहिती खास तुमच्यासाठी...

Adhik Maas
Adhik Maas 2023 :अधिक मास येता, आई अन्‌ जावयाचं कोडकौैतुक

पुरुषोत्तम पुरी हे बीड येथील माजलगाव तालुक्या पासून 22 कि.मी. अंतरावर असणाऱ्या गोदावरी माईच्या काठावर वसलेलं मंदिर.

विशेष म्हणजे भारतातील हे एकमेव मंदिर असून या धार्मिक स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की, पुर्वी शार्दुल नावाचा राक्षस पंचक्रोशीतील जनतेला त्रास देत होता.

भगवान विष्णु यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला व ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले, म्हणून आज देखील हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते. भाविक या चक्रतीर्थवर स्नान करतात व पशुधारी सावळ्याचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात.

Adhik Maas
Adhik Maas 2023 : जावई, गायीला वाण, मातेचे पूजन अन् 33 मेहूण भोजन; जाणून घ्या अधिक मासातील दानाचे महत्त्व!

या मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे गणपती बाप्पा ची 4 फूटी उंचीची मुर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि महालक्षेक्ष्वराची महादेवाची पिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात आहे. असा त्रिवेणी संगम तुम्हाला कुठे ही पाहायला मिळणार नाही. या गाभाऱ्याची प्रतिकृती वृंदावनातील कृष्ण मंदिरातील कृष्ण मंदिराची सारखी आहे. विशेष म्हणजे दोन्ही मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत.

स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना नक्कीच पहाण्याजोगा आहे. असं म्हणतात की, इ.स.वी. 1310 मध्ये रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. रामचंद्र यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने हे मंदिर उभारले. त्यामुळेच या मंदिराचं नाव 'पुरुषोत्तम पुरी' असं पडलं.

इतिहासाच्या दृष्टीने विचार करता, तुम्हाला येथे अनेक प्राचीन गोष्टींचा अनुभव येईल. रामचंद्र यादवांच ज्ञात ताम्रपट येथेच सापडला आहे. गोदाकाठी राक्षसभुवन, पुरुषोत्तम पुरी मंजरंथ, गंगामसला हे प्राचीन आणि सुंदर मंदिरे उभारलेली आहेत.

माहिती आवडली असेल तर या स्थळाला भेट नक्की द्या.

आश्विनी बाळनंद वाघमारे ( गुरव)

(आसावरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com