स्माईलीची भीती वाटते!

The article of Satish Karande scared smiley
The article of Satish Karande scared smiley

सुशांतसिंह राजपूत या प्रसन्न चेहऱ्याच्या अभिनेत्याने ऐन उमेदीच्या काळामध्ये आत्महत्या केली. त्याच्या अशा जाण्याने सर्वाना मोठी हळहळ वाटली, तशी ती समाज माध्यमावर व्यक्त ही झाली. या निमित्ताने पुन्हा एखदा आत्महत्या हा विषय चर्चेला आला. काहीजणांनी चित्रपट क्षेत्रातील आत्महत्या अशा पद्धतीने सीमित करून या विषयावर चर्चा केली. तर काहीजणांनी तरुणांच्या आत्महत्या अशा पद्धतीने चर्चेचा सूर ठेवला. मानसशास्त्राची जाण असणाऱ्यानी नैराश्य आणि आत्महत्या अशा पद्धतीने मांडणी केली आणि आत्महत्या या विषयावरची चर्चा अशा पद्धतीने झाली पाहिजे असे वाटले. कारण आत्महत्याची वर्गवारी शेतकऱ्याची आत्महत्या, अभिनेत्यांच्या आत्महत्या, अभियंत्याची वा अधिकाऱ्याची आत्महत्या अशी करणे हे फार उथळ व त्या समस्याचे मुळा पासून दूर नेणारे ठरेल असे वाटते. या अभिनेत्याची बातमी टीवीवर पहात असताना माझ्या ब्याण्णव वर्षाच्या आजीला ही धक्का बसला आणि तिने हळहळव्यक्त केली. पुढच्याच क्षणाला तिने प्रतिक्रिया दिली की “माणस फार नाजूक झाली आहेत”. तिची ही प्रतिक्रिया विचार करायला भाग पाडणारी अशी होती. त्यामुळे तिच्याशी या विषयावर थोडी चर्चा करावीशी वाटली. त्यावेळेस तिने सांगितले की तिच्या काळात
सततचा दुष्काळ, त्यामुळे होणारी नापिकी या मुळे आत्महत्या होत नसत. तिला प्रश्न केला की, तुझ्या ओळखीतल्या व्यक्तीने केलेल्या आत्महत्या तुला आठवतात का? तिची स्मरण शक्ती उत्तम असल्यामुळे साहजिकच तिला ते आठवत होते. तिने ते सांगायला सुरुवात केली. मागील वीस वर्षापासूनच्या अशा घटना सोडल्या तर तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तिला आठवणाऱ्या घटना होत्या
फक्त पाच. त्या पाचही घटना अगदी वेगळ्या म्हणजे कोणी नवऱ्याने सोडून दिले म्हणून आत्महत्या केली, तर कोणी नवऱ्याने दुसरे लग्न केले म्हणून. एकाने वाडा बांधला, त्यामुळे कर्ज झाले, संपूर्ण शेती विकावी लागली म्हणून आत्महत्या केली. त्यावेळेस फार कायदे नव्हते किंवा त्याचा वचकही नव्हता त्यामुळे या सर्व घटनामध्ये पर्यायच राहिला नाही अशा अवस्थेला जाणे आणि आत्महत्या करणे असे झाल्याचे दिसते. या चर्चे नंतर मी स्वतः तशाच पद्धतीने आठवण्याचा प्रयत्न केला तर मला माझ्या ओळखीतल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या म्हणजे अगदी विद्यार्थी,अधिकारी, शेतकरी अशा पंधरा लोकांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले. हा विषय आणखी पुढे नेण्यासाठी आणखी काही मित्राशी चर्चा केली, (त्यामध्ये जसे आयटी क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे होते तसेच शेतकरी मित्र ही होते) तर ही संख्या वाढतच जात होती हे लक्षात आले. त्याच वेळेस हेही लक्षात आले की यातील बऱ्याच आत्महत्या ह्या अलीकडील दहा पंधरा वर्षातील आहेत.आणि त्यापैकी पर्याच नाही अशा अवस्थेला जाऊन आत्महत्या केल्याची संख्या फार नगण्य अशीच आढळते. म्हणजे चांगला गाडीबंगला आहे,नोकरी गेली तरी चांगला उदरनिर्वाह होऊ
शकतो एवढे कमविले आहे. तरीही अशा लोकांनी आत्महत्या केल्याचे आढळते.
नैराश्य येणे आणि त्यातून आत्महत्या करणे याचा इतिहास फार मोठा आहे. त्या क्षेत्रातील तज्ञ असे सांगतात की दहा हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला त्यानंतर पुढे लोकांमध्ये “मालकी” भावना प्रस्थापित झाली, त्यातून स्पर्धा आणि पुढे नैराश्य आणि आत्महत्या. परंतु याचे प्रमाण फार कमी. जागतिकीकरण आले, त्याचे सुरुवातीला लोकांना विकासाच्या संधी मिळू लागल्या, त्याच अनुषंगाने
पैसा मिळू लागला, खरेदी क्षमता वाढू लागली त्यातून चंगळवाद वाढीस लागला गरजेच्या वस्तू कोणत्या व चैनीच्या कोणत्या याचा सुद्धा गोंधळ सुरु झाला . सर्व काही मार्केट ठरवू लागले म्हणजे अगोदर वस्तू निर्माण झाल्या त्यातून त्याची कशी गरज आहे याचा भडीमार जाहिरातीच्या माध्यमातून होऊ लागला. त्यातून ती वस्तू घेणे माझ्या स्टेटसला गरजेचेच आहे असे वाटू लागले.
त्यामुळे चैनीच्या वस्तू गरजेच्या बनू लागल्या. सौंदर्यप्रसाधने पासून दुचाकी मोटारगाड्या पर्यंत हे असे होताना दिसते. परंतु मागील दहा वर्षापासून जागतिकीकरण व त्यातून विकास साधने याच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या. त्यामुळे नोकऱ्या कमी झाल्या. असणाऱ्या नोकऱ्या मध्ये अस्थिरता निर्माण झाली. त्यातून असुरक्षितता आली आणि त्याचा परिणाम म्हणजे नैराश्य येणे
वाढीला लागले. संयुक्त राष्ट्र संघाचे एका अभ्यासानुसार २०२५ पर्यंत जगामध्ये २५ टक्के लोकांना
नैराश्य या आजाराने ग्रासलेले असेल. तर भारतामध्ये प्रत्येक सहावा व्यक्ती हा कोणत्यातरी मानसिक आजाराने पिडीत आहे. त्यातील फार थोडे जण त्यावर समुपदेशन किंवा इतर उपचार घेतात. त्यामुळे ही समस्या पुढे मोठे उग्र स्वरूप धरण करेल अशी भीती वाटते. पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सुद्धा चांगले समुपदेशक बनू शकतात परंतु आपण त्यांचे पुढे व्यक्त होत नाही किंवा त्यानाही तेवढा वेळ नसतो. हा विषय आणखी वेगळा. समाज माध्यमावर आपण व्यक्त होतो, अगदी शुभ शनिवार म्हणूनही आपण शुभेच्छा देतो, रोजरोज च्या सेल्फि काढून त्या
मित्रांना पाठविण्यास ही आपण थकत नाही. एवढी व्यक्त होण्यासाठीची साधने असतानाही आपले नैराश्य का कुठे व्यक्त होत नाही. ते कसे काय लपून राहते? एका चित्रपटामध्ये सुशांत आपल्या मुलास आत्महत्या हा मार्ग नाही म्हणून सांगतो. त्याचा तो अभिनय आपणास खूप भावतो मात्र तोच अभिनेता आपल्या खऱ्या जीवनात मात्र आत्महत्या करतो हे फार मोठे विचित्र वाटते. त्यामुळे आज
एखाद्याने आणि तेही तरुणाने समाज माध्यमावर स्माईलीचे स्टेटस ठेवले, किंवा खूप एन्जॉय करतानाचे फोटो ठेवले तर भीती वाटते कारण त्याचे असे व्यक्त होणे कदाचित त्याचा अभिनय असू शकतो. हे शोधायचे कसे आणि कुणी हाच मोठा प्रश्न.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com