राधानगरीतील काजवा महोत्सव

Radhanagri
Radhanagri

सध्या काजवा महोत्सवाबद्दल लेख सगळीकडे वाचला जात आहे आणि त्या द्वारे काजवा महोत्सव म्हणजे एक विनाशकारी पर्यटन मोहीम आहे अस मत अनेकजण सोशल मीडियावर मांडले जात आहे. पण नक्कीच हा महोत्सव निसर्गाची हानी करतोय का माणसाचे आणि निसर्गाचे नाते घट्ट करतोय याचा सुद्धा विचार समाजातील सर्व घटकांनी करावा असा मला वाटत. प्रस्तुत लेखात मांडलेले अनेक मुद्दे निश्चित योग्य आहेत. त्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमींना हा महोत्सव निसर्गाचा शत्रू आहे असाच वाटू लागलाय. महाराष्ट्रातील राधानगरीमध्ये गेले दोन वर्षे आम्ही बायसन नेचर क्लब या संस्थेमार्फत हा महोत्सव घेत आहोत यावेळी आलेले अनुभव मी याठिकाणी सांगत आहे. 

वास्तविक जंगल वाचले पाहिजे, निसर्ग पर्यावरण वाचले पाहिजे हे प्रत्येक शहरी लोकांना वाटते कारण त्यांना जंगलाचे महत्व जाणवू लागले आहे पण जे वर्षानुवर्षे जंगल परिसरात राहतात आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, त्यांच्या बऱ्याच पिढ्या आता शहाराकडे स्थलांतर करत आहेत त्यांना जंगल परिसरात पर्यटनातून रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर ती चूक आहे का?
जंगलात राहणाऱ्या आमच्या पिढ्यान पिढ्यानी हे जंगल आपले दैवत म्हणून सांभाळले आहे, शासनाच्या जाचक अटींमुळे जंगलात वर्षोनुवर्षे राहणाऱ्या या खऱ्या जंगल वासियांना जंगलच आपलं शत्रू वाटू लागलाय अशी परिस्थिती असताना शहरी आणि या जंगल परिसरातील स्थानिकांचा परस्पर संबंध या महोत्सवामुळे येऊ लागला, शहरी लोकांना पण जंगलात हे लोक कोणत्या अवस्थेत राहतात हे जाणवू लागले, सगळेच पर्यटक हे निसर्गाची नासधूस करायला येतात हा गैरसमज आहे असं वाटत मला,

परदेशातील शाश्वत पर्यटनचे आपण उदाहरण देता पण आपल्याकडे असे पर्यटन होऊच शकत नाही असा अविश्वास आपल्याच बांधवांवर नका ठेऊ. निश्चितीच काजवा महोत्सवात जे चुकीचं होतेय, झालंय त्यामध्ये परिपूर्ण बदल केला जाईल. राधानगरीमध्ये भरवला जाणार काजवा महोत्सव हा कोणत्याही प्रकारच्या वन्यजीव विभागाच्या संरक्षित भागात होत नाही आणि या महोत्सवाच्या उदघाटन, सांस्कृतिक कार्यक्रम हे मुख्य जंगलापासून 2 किमी वर खासगी मालकी जागेत योग्य ती सगळी खबरदारी घेऊन घेतला जातो.

यावर्षी स्थानिक जंगलातील वाड्यातील शालेय मुलांनी 60 हजार रुपयांचा रानमेवा विकला ती कमाई त्यांना शालेय साहित्य घेण्यासाठी उपयोगी पडेल ना.. या काजवा महोत्सवामुळे त्या स्थानिक लोकांना पण समजले आहे की काजवे दिसले तरच पर्यटक आपलेकडे येणार त्यामुळे त्यांना एकदा खबरदारी कशी घ्यावी सांगितली के ते निश्चितीच घेतील तेवढा विश्वास त्या स्थानिक लोकांवर आम्ही ठेवला आहे. 
मी बायसन नेचर क्लब या संस्थेमार्फत राधानगरीत हा महोत्सव गेली दोन वर्षे घेतो, या संस्थेत काम करणारे सगळे कार्यकर्ते हे स्थानिक राधानगरी वासीय आहेत. आम्ही आमच्या परीने स्थानिक नागरिक आणि शहरी पर्यटक यांचा दुवा होण्याचा प्रयत्न करतो. 

काही उद्दाम पर्यटकांनी केलेला प्लास्टिक कचरा आम्ही महोत्सवानंतर पूर्ण साफ केला आहे, हवं तर आज ही कुणीही त्याठिकाणी भेट देऊन ते पाहू शकता. आम्ही प्रत्येक कुटूंबवत्सल पर्यटकाला हा निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळावा म्हणून मोफत हा महोत्सव साजरा केला, 15 दिवस आमचे सर्व कार्यकर्ते मोफत त्या ठिकाणी सेवा करत होते, हा निसर्गाचा अविष्कार पाहून वृद्धांपासून बालकापर्यंत प्रत्येकाला होणारा आनंद शब्दात पण सांगता येणार नाही एवढा अविस्मरणीय होता.

काही बेशिस्त पर्यटकांमुळे या संपूर्ण महोत्सवातील पर्यटकांना दोष देने मला योग्य नाही वाटत. राधानगरीचा काजवा महोत्सवाबद्दल काहीही उपाय योजना असतील तर निश्चित तुम्ही आम्हाला सांगा आम्ही स्थानिक कार्यकर्ते त्यामध्ये निश्चित कठोर नियम करून त्याची अंमलबजावणी करू. पण निसर्गाचा हा सुंदर अविष्कार आमच्या राधानगरीसाठी विनाशकारी नसून खूपच आश्वासक आणि आशादायी आहे. सर्व पर्यावरण अभ्यासकांची मनापासून माफी मागतो पण खरंच एक कळकळीची विनंती आहे. आपलेला खरच पर्यावरण हा पश्चिम घाट टिकवायचा असेल तर या परिसरातील लोकांना रोजगाराचा शाश्वत मार्ग हा *पर्यंटनच* आहे हे समजून घ्या आणी स्थानिक लोकांचे पर्यावरण पूरक पर्यटनासाठी प्रबोधन करा.

आम्ही गावाकडची लोक जास्त शिकलेलो नाही आहे. आम्हाला कुणाशी वाद नाही घालायचा फक्त आमच्याशी मनापासून संवाद करा. जंगल, वन्यजीव हे आमचे सगेसोयरे आहेत त्यांच्यावर आमची उपजीविका आहे त्यामुळे आम्ही जंगलाची वन्यजीवांचे रक्षण नेहमीच करतो आणि आयुष्यभर करतच राहू.
- बायसन नेचर क्लब (राधानगरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com