तुम्ही पाहिली का बाहुबली शिवपिंड?

bahubali-shivpind.jpg
bahubali-shivpind.jpg

जेजुरी : श्रावणमहिना आला कि, गावकडच्या नदीकिनाऱ्यावरील शिवमंदिराना उजाळा मिळत असतो. हीच शिवमंदिरे आपल्या अध्यात्मिक संस्कार संस्कृतीच्या लोकपरंपरांची ओळख देत शतकानुशतके उन्ह वारा पाउस झेलत उभी आहेत तर काही मंदिरे काळाच्या ओघात गडप झाल्याचा इतिहासही महाराष्ट्रात घडला आहे. असेच प्राचीन अर्वाचीन इतिहासाच्या शिल्पकला संस्कृतीची साक्ष देणारे व दगडी    सिंहासनावर विराजमान असलेले बाहुबली शिवलिंग असलेले पांडेश्वर श्रावण महिन्यात भक्तीभावाने बहरून जाते.                                      
तीर्थक्षेत्र जेजुरीच्या उत्तरपूर्व बाजूस मल्हारसागर जलाशयाजवळून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेले पांडेश्वर हे देशात फक्त आंध्रप्रदेश चेलजी व   महाराष्ट्रातील त्रिविक्रम संस्कृतीतील साम्य आढळणारे शिवालय आहे. मंदिरच्या मुख्य बांधकाम शैलीचे प्रवेशद्वार पाहताक्षणी मनात भरते. त्यावर चालुक्य शैलीची छाप दिसून येते. प्रवेशद्वारावरील जय विजय भग्न अवस्थेत आढळतात तरही हे प्रवेश द्वारपर्यटकांचे लक्ष वेधून घेते. सभामंडपात प्रवेश केल्यावर पूर्वी आढळणाऱ्या गिलाव्यावरील इ.स १९१६ मधील शिल्प रंगकाम व भिंतीचीत्रेकला दिसते जी आत्ता नष्ट होऊ लागली आहेत.

महाभारतातील पांडव वनवासात असताना त्यांनी प्रस्तापिथ केलले शिवलिंग आहे, असा प्राचीन इतिहासही येथे सांगितला जातो. पाच पांडवानी या पवित्र भूमीत यज्ञ आणि पितृ श्राद्ध केल्याने आजही या शिवाल्यास पांडेश्वर असे म्हंटले जाते. आजही काही भाविक मोठ्या भक्ती भावाने येथे श्राध्द घालत असतात. त्याला कुंभश्राध्द असेही म्हणतात. हे येथे आढळणाऱ्या विरघळ व सतीशिळावरून दिसून येते. येथे  पाच पांडवांची देवकुळे हि अस्तित्वात आहेत. इतकेच काय तर, मंदिरा लगतच्या वावाऱ्यांवर अनेक देवीदेवतांच्या वाळूकाश्मय प्रतिमांचे कोरीव काम दिसून येते. सुमारे आठव्या व अकराव्या शतकातील दगडीबांधकाम असल्याचे त्याच्या गिलाव्यावरील उपलब्द पण जीर्ण अव्यव्स्तेतील लिखनावरून समजते या ठिकाणी मुख्य गर्भगृहातील शिवपिंड हि विस्तीर्ण दगडी चौरंगावर असून मानवी बाहूत सहसा न मावणारे हि शिवपिंड क्वचितच पाहवयास मिळते. कऱ्हा नदीकाठी दुर्लक्षित असे हे शिवालय श्रावण  महिन्यात अथवा शिवरात्रीच्या वेळी चर्चेत येत असते. परंतु या शिवालयास पर्यटन विकासाचा शासनाने दर्जा द्यावा असे यथील भाविकांचे मत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com