रस्ते सुरक्षा : जीवन-मरणाचा प्रश्‍न !

Construction Of Tourist Destination On Mandangad Fort Ratnagiri Marathi News
Construction Of Tourist Destination On Mandangad Fort Ratnagiri Marathi News

रस्ते सुरक्षा, याचा अर्थ स्वत:बरोबर इतरांचीही काळजी वा सुरक्षा याचा अंतर्भाव होतो. आजकाल नैसर्गिक मृत्यू वा आजारपणाने होणाऱ्या मृत्यूपेक्षा रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढीस लागले आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, ओव्हरटेक, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे या आणि अन्य कारणांनी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे आज रस्ते सुरक्षा हा जीवन-मरणाचा प्रश्‍न होऊ पाहत आहे. 
अविरत जनसेवेची पंच्चाहत्तरी गाठून शतकाकडे वाटचाल करणारी एसटी आजही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. या एसटीने जनमानसांत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असे असले तरी एसटीचे होणारे अपघात ही समस्या देखील उग्ररूप धारण करत आहे. सध्या रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. आता हेच बघा ना, गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात विविध मार्गांवर एसटीचे ५०५ अपघात घडले; तर या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना गेल्या तीन वर्षांत तब्बल सुमारे आठ कोटी सात लाख रुपये नुकसान भरपाईच्या स्वरूपात दिले आहेत.

एसटीचे बहुतांश अपघात खराब रस्ते, इतरांच्या चुकांमुळेही होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, या अपघातानंतर रा. प. चालकांना जबाबदार धरले जाते आणि नुकसान भरपाईबद्दल एसटीवर खटला दाखल केला जातो. यात एसटी चालकाचा दोष असेल तर नुकसानभरपाई दिली जाते. त्यानुसार एखादा व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, तर जखमींना औषधोपचाराचा खर्च दिला जातो. एसटी प्रशासन एवढ्यावरच थांबत नाही, तर अपघात प्राणांतिक असेल तर संबंधित चालकाला दहा दिवसांचे तसेच किरकोळ असेल तर सहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात झालेली चूक चालकाच्या निदर्शनास आणून दिली जाते.

याशिवाय विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्याचीही योजना आहे. एका वर्षात २६० दिवस विनाअपघात सेवा करणाऱ्यांना एक हजाराचे बक्षीस दिले जाते. गेल्या वर्षी एक हजार २२० चालकांना बक्षिसापोटी ११ लाख ६० हजार ८०० रुपये देऊन गौरवले; तर ९९ चालकांना सुरक्षा सेवा बिल्ले प्राप्त झाले. रस्ते अपघातात एखाद्याचा प्राण जर गेला तर त्याचे सारे कुटुंब उद्‌ध्वस्त होते. याचा विचार करायला हवा. प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती होत असते. मात्र, जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येकाने स्वत:सह इतरांच्या जीविताची काळजी घ्यायला हवीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com