फेक न्यूज आणि व्हायरल पोस्ट...

fakw news prafull sutar blog
fakw news prafull sutar blog

   दिवसागणिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टिकटॉक या सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया साधनांवर मजकूर, व्हिडिओ, फोटोंची अविरतपणे देवाण-घेवाण सुरू असते. 
सातत्याने पोस्ट होणाऱ्या घटना, घडामोडींची संख्या इतकी प्रचंड आहे, की त्याच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे केवळ अशक्‍य बनले आहे. एखादी पोस्ट ग्रुपवर पडली की ती किमान अडीचशेवर युजर्सपर्यंत पोचते आणि ग्रुपमधील युजर्सकडून अन्य युजर्स तसेच ग्रुपवर फॉरवर्ड केली जाते. यालाच ‘व्हायरल’ हा प्रचलित शब्द झााला आहे.

चुकीची घटना, घडामोड पसरविणे किंवा मूळ घटनेत हवा तो बदल करून ती पोस्ट करणे याला ‘फेक न्यूज’ म्हटले जाते. आणि  ती जाणूनबुजून पसरवली जाते. ‘फेक न्यूज’मध्ये मजकुराबरोबरच छायाचित्रे आणि व्हिडिओज्‌चा समावेश होतो. मूळ घटनेत हवा तसा बदल करून ती नव्याने सोशल मीडियावर पोस्ट केली जाते. यामध्ये भावनिक आधार घेत या पोस्ट खऱ्या असल्याचा भास बिंबवला जातो. आपणही त्या खऱ्या समजून पुढे फॉरवर्ड करतो. विशेषतः व्हॉट्‌सॲपवर असे प्रकार नित्याचे झाले आहेत. याला फोटो, व्हिडिओ एडिटिंग ॲप्सनी हातभार लावला आहे. या ॲप्सच्या मदतीने मजकुरासह फोटो, व्हिडिओत हवे तसे बदल केले जातात. या ॲप्सवरूनच ते शेअर करण्याची व्यवस्थाही असल्याने झटपट एडिटिंग आणि शेअरिंग केले जाते. विशेषतः भावनिक पोस्ट या  अधिक व्हायरल होत असल्याचे दिसते. 

भारतात सायबर गुन्हे कायदा अस्तित्वात असला, तरी या कायद्यात ‘फेक न्यूज’बाबत स्पष्ट तरतूद दिसून येत नाही. तसेच, रोज इतक्या प्रचंड संख्येने पोस्ट पडत असतात, त्यातील प्रत्येक पोस्टची सत्यता पडताळणे, सायबर गुन्हे यंत्रणेला शक्‍य नाही. किंवा अशा पोस्ट रोखणेही केवळ अशक्‍य आहे. पश्‍चिम बंगालमधील ‘पोस्ट कार्ड’ नावाची एक वेबसाईट आहे, की जी केवळ खोट्या गोष्टी पसरवून बक्कळ पैसे कमावते. अनेक राजकीय मंडळींकडूनही फेक न्यूजचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातोय. विरुद्ध गट, पक्षातील नेतेमंडळींच्या पोस्टमध्ये बदल करून त्या व्हायरल करण्याचे प्रकार पाहावयास मिळत आहेत.

गुगलने सर्च इंजिनमध्ये आक्षेपार्ह, खोट्या गोष्टी शोधण्यासाठी अमेरिकेसह अन्य देशांत ‘टॅग’ यंत्रणा आणली आहे. यात एखादी गोष्ट खोटी वाटत असेल तर त्याखाली युजर्स क्‍लिक करून ‘आय एम डाउटफूल..’ हा पर्याय निवडू शकतात. अधिक लोक पोस्टविषयी शंका व्यक्त करीत असतील, तर गुगलचे तज्ज्ञ ती पोस्ट खरी की खोटी तपासतील, आणि त्यावर गुगल कारवाई करेल, अशी ही पद्धत आहे. फेसबुक, ट्विटर यांनीही सोशल मीडियावर वाढत्या फेक न्यूज, व्हायरल गोष्टी रोखण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे. यानुसार ‘ट्रस्ट इंडिकेटर’ हे तंत्र आणले आहे. त्यावर क्‍लिक करताच ती घटना, घडामोडीचे स्रोत, लेखक यांची माहिती मिळते. तसेच, ती घटना लेखकाचे वैयक्तिक मत आहे की जाहिरात, हेही स्पष्ट केले जाते. शेवटी युजर्सनीच एखाद्या पोस्टविषयी शंका असेल तर त्या फाॅरवर्ड न करता डिलीट केल्यास, हे प्रकार काही अंशी थांबवणे शक्य होईल, आणि हाच सध्या तरी पर्याय आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com