More than 100 books were donated to Arvi Gram Panchayat in Shrigonda on Independence Day as part of a five-year rural book donation initiative.
esakal
कुणाल मांडे
दरवर्षी माझा वाढदिवस मी थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना या निमित्ताने मी पुस्तके भेट देतो. गेली पाच वर्षे सलगपणे मी हे काम करतोय. पण आजच त्याबद्दल लिहावेसे वाटतेय, कारण गेली पाच वर्षे या उपक्रमाने मला खूप समाधान आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद दिला आहे. तो या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचावा, ही इच्छा आहे.
या वर्षी 'आर्वी ' या श्रीगोंदा तालुक्यातील गावाच्या ग्रामपंचायतीची मी पुस्तक भेटीसाठी निवड केली होती. आर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप शिर्के हे माझ्या मित्राचे, सचिन हिरनावळे यांचे परिचित आहेत. त्या दोघांनी या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित करून ठेवले होते. दिवस होता 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन.