Navratri Day 2 : ब्रह्मचारिणी

Brahmacharini Devi, Navratri Day 2, Goddess Durga : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तप, संयम, त्याग आणि दृढ निश्चयाचे प्रतीक असलेल्या या देवीच्या स्वरूपाचे महत्त्व, पौराणिक कथा, पूजाविधी आणि मंत्र जाणून घ्या.
Goddess Brahmacharini symbolizes penance, devotion, self-discipline and unwavering determination on the second day of Navratri.

Goddess Brahmacharini symbolizes penance, devotion, self-discipline and unwavering determination on the second day of Navratri.

esakal

Updated on: 

डॉ. अपर्णा कल्याणकर

आज नवरात्रीची दुसरी माळ! ब्रह्मचारिणी स्वरूप समजून घेऊ. ब्रह्मदेवांची शक्ती सरस्वती, विष्णूंची शक्ती लक्ष्मी आणि रुद्रांची शक्ती काली या अनुक्रमे सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि संहाराच्या शक्ती आहेत. सरस्वती आपल्याला ज्ञान, विद्या, कला, कर्मांमधील कौशल्य, वाणीची शुद्धी, वैचारिक परिपक्वता, विवेक, सद्बुद्धी, सुयश, कीर्ती, सर्जनशीलता, परिपूर्णता या सगळ्या गुणवत्तापूर्ण गोष्टी देते. लक्ष्मी आपल्याला समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य, सौंदर्य, वैभव, संतती, प्रेम, आरोग्य, वाहनसौख्य म्हणजे एकूणच ऐहिक सुख आपण ज्याला म्हणतो, ते सर्व उपभोग आणि सौख्य देत असते.काली शक्ती आपल्याला पराक्रम, शक्ती, कर्तृत्व,आत्मविश्वास, निर्भयता, उत्साह हे सगळे लढाऊ गुण देत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com