Buddha Purnima: बुद्धांचा कालामसुत्त: स्वानुभवावर आधारित विवेकाचा उपदेश; सोशल मीडियाच्या युगात कालामसुत्ताचा तरुणांसाठी मार्गदर्शन

Buddha teaching the Kalamasutta: बुद्धांचा कालामसुत्त उपदेश, स्वानुभवावर आधारित विवेक, सोशल मीडिया काळात निर्णय घेण्याचे मार्गदर्शन.या उपदेशातून तरुणांना सत्य शोधण्याचे आणि ज्ञानप्राप्तीचे शिक्षण मिळते.
Buddha Purnima

Buddha Purnima

esakal

Updated on

बुद्धांचा विवेक स्वातंत्र्याचा विचार मार्गदर्शक

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गोतम बुद्धांच्या ‘कालामसुत्त’ या विचारांची ओळख करून देताना त्यांच्या विवेक स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यांची बुद्धपौर्णिमेनिमित्त घेतलेली मुलाखत

बुद्धांनी दिलेला कालामसुत्ताची पार्श्वभूमी आणि त्याचा संदेश काय?

डॉ. साळुंखे : कालामसुत्त हा बुद्धांचा एक कालातीत उपदेश आहे. तो सार्वकालिक आणि सार्वत्रिक आहे. त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. प्राचीन काळी कालाम या नावाचे काही लोक होते. ते कोसल प्रदेशातील एका बाजारपेठेच्या गावात राहात होते. बुद्ध एकदा आपल्या भिखू संघासोबत चारिका करीत त्या गावात पोहोचले. बुद्ध आपल्या गावात आले आहेत, हे समजल्यावर कालाम लोक त्यांच्याविषयीच्या आदरापोटी त्यांना भेटायला आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com