
नुकतेच छापून झालेले माझे नवे पुस्तक `Journalism Stories From Goa and Maharashtra' विनिता देशमुख यांच्या कॉर्पोरेट ऑफिसात काल जाऊन मी दिले.बातमीदार आणि पत्रकार म्हणून माझी पूर्ण कारकीर्द ही केवळ इंग्रजी दैनिकांतली.सुरुवातीला गोव्यात The Navhind Times, त्यानंतर फक्त एक वर्षांसाठी छत्रपती संभाजीनगरात Lokmat Times, नंतर पुण्यात एक दशकभर Indian Express. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रोडवर The Times Of India आणि अखेरीस सकाळ वृत्तमाध्यमाच्या Maharashtra Herald नंतरचे Sakal Times मध्ये तब्बल चौदा वर्षे नोकरी. तिथेच निवृत्ती.