esakal | कोरोना आपत्तीत महाविद्यालयीन विद्यार्थी व पालक यांच्या समोरील आव्हाने व जबाबदाऱ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Challenges and Responsibilities Facing College Students

कोरोना व्हायरस प्रकारातील कोवीड - 19 या संसर्गजन्य मानवी जीवीतास आपत्ती निर्माण करणाऱ्या विषाणूने चालू दशकाच्या अंतिम वर्षाच्या सूरूवातीसच मानवी शरीरांचा कब्जा घेण्यास सूरूवात केली. प्रारंभी काहि शहरातून सूरू झालेली ही महामारी अडीच-तीन महिन्यात जगभरात पसरली.

कोरोना आपत्तीत महाविद्यालयीन विद्यार्थी व पालक यांच्या समोरील आव्हाने व जबाबदाऱ्या...

sakal_logo
By
प्रा.दत्तात्रय मांजरे

कोवीड - 19 पासून मानवास वाचेवेल असे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही उत्पादन उपयोगी नाही या पार्श्वभूमीवर कोवीड-१९ पासून मूक्ती नाही पण प्रसार नियंत्रित करणाचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यसंस्थांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आणि भारतात २४ मार्च मध्यरात्रीपासून टाळेबंदीची अंमलबजावणी सूरु झाली अन् शाळा, महाविद्यालयांमधील अध्यापन, मूल्यमापनाचे कार्यस्थगित झाले. टाळेबंदीचा काळ वाढत गेला तशी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालक यांच्या अध्यापन, परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्ष, करिअर नियोजन याबाबतच्या संभ्रमावस्थेने चिंता वाढवली.

कोवीड - 19 चा प्रतिबंध करण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील प्रयत्न अजून तरी निष्फळ ठरत असले तरी राज्यसंस्थेने टाळेबंदीबाबत नविन नियमावलीसह जनजीवन सूरळीत करण्याचे प्रयत्न सूरू केले आहेत. या सगळ्या गत पाच महिन्यातील घडामोडींनी व सद्यकालीन परिस्थितीने महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालक यांच्यासमोर अनेकविध आव्हाने उभी ठाकली असून त्यांना सामोरे जाण्यासाठी या सर्वांना नव्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागाणार व मोठ्या धैर्याने शिक्षण व्यवस्थेतील बदलांना सामोरे जावे लागणार आहे. या दृष्टीने पुढील विवेचनात भाष्य करण्याचा माझा प्रयत्न आहे.

सध्या तरी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असल्याचे चित्र आहे. त्यामूळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्ञानोपासनेत खंडितपणा आला असल्याच्या शक्यतेमुळे होणाऱ्या परीक्षांना योग्य तयारी, उचित मनोबल व आत्मविश्वासाने सामोरे जाणे आव्हान निर्माण झाले आहे. शैक्षणिक संस्थांकडून अंतिम वर्ष परीक्षांबाबतच्या आपण किंवा आपला पाल्य प्रवेशित असलेल्या शिक्षण संस्थेकडून अधिकृतपणे निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांना योग्य व उचित वेळेत प्रतिसाद देणे सर्व अंतिम वर्षांचे विद्यार्थी व पालक यांचे आद्य कर्तव्य व प्रमुख जबाबदारी आहे.
विविध माध्यमांमध्ये येणाऱ्या पदवी अंतिम वर्ष परीक्षांबाबत माहितीच्या आधारे विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी ज्ञानोपासनेत खंड पडु देणे व परीक्षांबाबत गाफील राहणे आत्मघातकी ठरू शकेल.

पदवी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष तसेच पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्ष यांच्या परीक्षा होणार नसल्या तरी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापना संदर्भात आकृती बंध विद्यापीठांनी जाहीर केला असून त्यासंदर्भात आवश्यक कृतींसाठी व अचूक माहितीसाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालक यांनी महाविद्यालय परीक्षा विभाग, विषय शिक्षक यांच्याशी संवाद ठेवणे आवश्यक असून पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशित होण्यासंदर्भात महाविद्यालयांकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे स्वतःहून अवलोकन करून घेणे व त्यांचे पालन करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे.
शैक्षणिक संस्थांच्या कामकाजबाबत राज्यसंस्थेने व उच्च शिक्षण संस्थांनी लागू केलेल्या नियमावलीचे अवलोकन करता महाविद्यालयातील अध्यापन कामकाज दरवर्षीपेक्षा विलंबाने सूरू होणार हे निश्चित आहे. त्यामूळे दरम्यानच्या काळात विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश घ्यायच्या वर्गासाठीचा विषय निहाय अभ्यासक्रम ज्ञात करून घेऊन त्यासंदर्भात अध्ययन कृतींची सूरुवात करणे हे एक आव्हान आहे.

या संदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी विषय शिक्षक, महाविद्यालयांच्या वेबसाईटस, संबंधित विद्यापीठांच्या वेबसाईटस इत्यादींच्या आधारे अभ्यासक्रम ज्ञात करुन घेणे व त्या संदर्भात विविध ई- साधनांचा आधार घेऊन अध्ययन सामुग्री संकलनाची जबाबदारी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी पार पाडल्यास अध्ययन कृतींची सूरुवात करण्यास अडचणी येणार नाहीत. याशिवाय अनेक महाविद्यालयीन शिक्षक डिजिटल साधनांच्या आधारे वाचन साहित्य, मार्गदर्शन यांचे नियोजित असेल तर विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालक यांनी जागृत राहून प्रतिसाद दिल्यास अध्ययन कृतींमध्ये अचुकता व गती प्राप्त होईल. पदवी प्रथम वर्षात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशित होताच संबंधित विषय शिक्षकांशी संवाद साधून अभ्यासक्रम व अध्ययन कृतींबाबत मार्गदर्शन घेणे अधिक योग्य राहिल.

पदवी अंतिम वर्षांच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा कोर्स व त्यासंदर्भातील प्रवेश प्रकियांबाबतच्या संबधित उच्च शिक्षण संस्थांच्या सूचनांवर लक्ष ठेवून योग्य व आवश्यक त्या कृती करणे व उचित वेळेत प्रवेश प्रक्रिया करणे ही जबाबदारी पार पाडणे हिताचे राहिल. शिक्षण क्षेत्रातील या आव्हानांना सामोरे जात असताना आपणास कोरोना आपत्तीशी ही लढायचे आहे. आपण सर्वजण वैयक्तिक आरोग्य, सामाजिक आरोग्य व प्रशासनास पूर्ण सहकार्य करून नित्य कर्तव्य प्रामाणिकपणे व वेळेवर पूर्ण करूया. पुढील शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

( लेखक राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत )

loading image
go to top