Navratri Day 3 : चंद्रघंटा

Chandraghanta Devi, Navratri Day 3, Goddess Durga नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीचे स्वरूप, महिषासुराशी युद्धाची पौराणिक कथा, पूजाविधी, आवडते रंग, नैवेद्य आणि उपासनेचे महत्त्व जाणून घ्या. देवीच्या कथेतून संघटित शक्तीचा संदेशही मिळतो.
Chandraghanta Devi, Navratri Day 3,

Chandraghanta Devi, Navratri Day 3,

esakal

Updated on: 

डॉ. अपर्णा कल्याणकर

चंद्रघंटा : नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस! तिसऱ्या दिवशी 'चंद्रघंटा' देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे.कालच्या कथेनुसार शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाल्यानंतर ती दोघे अतिशय आनंदाने कैलासावर मार्गक्रमणा करू लागली.त्याच बरोबर दुसरीकडे कालक्रमानुसार विश्वात अनेक घटना घडत होत्या. त्यांपैकी एक घटना म्हणजे देव- दानवांच्या अखंड १०० वर्षे सुरू असलेल्या घनघोर रणसंग्रामात देवसेना पराजित होऊन महिषासुर नावाचा राक्षस देवाधिपती इंद्र बनला. अर्थातच दानवी स्वभावानुसार त्याने संपूर्ण त्रैलोक्याला 'त्राहि भगवान् ' करून सोडले.तेव्हा सगळे पराभूत देव प्रजापती ब्रह्मदेवांच्या नेतृत्वाखाली भगवान विष्णू आणि शिव यांना भेटायला गेले. महिषासुराच्या अत्याचारांचा सगळा वृत्तांत त्यांनी त्या दोघांना सांगितला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com