

वो अपने घर के दरींचो से झांकता कम है
ताल्लुकात तो अब भी है मगर राब्ता कम है।
तुम उस ख़ामोश तबियत पर तंज मत करना
वो सोचता है बहोत मगर बोलता कम है।
और मैं अपने बच्चों के ख़ातिर जाँ दे देता
मगर ग़रीब की जाँ का मुआवज़ा कम है।
डॉ. नवाज देवबंदी यांच्या गझल मधील हे शेर एका सर्वसामान्य गरीब व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, परिस्थिती, हतबलता व तितकीच कणखर मानसिकता देखील प्रकट करतात. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी एक गरीब माणूस किती खोल विचार करू शकतो याचं एक उपहासात्मक उदाहरण देताना डॉ. देवबंदी यांनी गरिबीचे विदारक चित्र तर उभे केलेच आहे, पण त्यातून गरिबीच्या वाट्याचा संघर्षही दाखविण्याचाही यशस्वी प्रयत्न केला आहे. शेरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे असेच लाखो पालक आज देशात आपल्या पाल्यांसाठी जीवापाड मेहनत करीतच असतात, पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्या श्रमाचा पुरेसा मोबदला मिळत नाही.