समाजाभिमुख कला

लेखक : शर्वरी लथ
सोमवार, 23 मार्च 2020

रोजच्या जीवनातील गोष्टी/वस्तू सुखकारक व सौंदर्यपूर्ण करण्यासाठी आराखडा व डेकोरेशनवर भर देतात त्यांना आपण अप्लाइड आर्ट म्हणू शकतो. सौंदर्यनिर्मिती हा फाइन आर्टचा मुख्य उद्देश असतो. विचारशक्ती व बुद्धीला चालना देणाऱ्या सौंदर्यपूर्ण वस्तूंचा व्यवहारात प्रत्यक्षपणे उपयोग होईलच असे नाही. प्रयोजनमूल्य असलेल्या हेतूप्रधान कलांसाठी अप्लाइड आर्ट असे सर्वसमावेशक नाव वापरले जाते. फाइन आर्ट क्षेत्रापेक्षा वेगळ्या ढंगाच्या व्यावसायिक व समाजभिमुख कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या कला म्हणजे अप्लाइड आर्ट. व्हॅल्यू ऍडिशन हा अप्लाइड आर्टचा मुख्य उद्देश. प्रत्यक्ष जीवनात मात्र आपल्याला फाइन आर्ट व अप्लाइड आर्ट यांची सरमिसळ पाहावयास मिळते. डिझाइन अथवा संकल्पना अशी संज्ञा आज व्यापक अर्थाने अप्लाइड आर्टच्या संदर्भात वापरली जाते. आर्किटेक्‍चर हादेखील अप्लाइड आर्टचाच एक प्रकार आहे. 

सौंदर्यशास्त्र आराखडा वा संकल्पना, ग्राहकाची गरज, त्यांच्या समस्येवर योग्य व्यावहारिक तोडगा वा इतर अशा सर्व गोष्टी अप्लाइड आर्टच्या विस्तृत क्षेत्रात येतात. ग्राफिक डिझाइन, फॅशन डिझाइन, आर्किटेक्‍चर, ऑटोमोटिव्ह डिझाइन, ऍडव्हरटायझिंग, सिरॅमिक्‍स असे अभ्यासाचे अनेक विषय या कलेत मोडतात. फाइन आर्टस्‌ जेथे फक्त सौंदर्यप्रीत्यर्थ निर्मिती केली जाते. हे अप्लाइड आर्टपेक्षा खूपच भिन्न असते. जरी या दोन कलाप्रकारातील सीमारेषा अंधुक असल्या तरी आपण त्याचा आढावा खालीलप्रमाणे घेऊ शकतो. फाइन आर्ट हा बुद्धीजिवी व्यवसाय वा छंद आहे, तर अप्लाइड आर्टमध्ये उपयुक्ततेवर भर दिला जातो. फॅशन हे या फरकाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. एखाद्या डिझायनरचे कॅटलॉग करणाऱ्या मॉडेलनी घातलेले महागडे-खर्चिक कपडे आणि त्याच डिझायनरचे मुख्य बाजारपेठेत आपण विकत घेत असलेले कपडे यात जमीन-आसमानचा फरक असतो. स्टुडिओ आर्टिस्ट हंग लू च्या मते उदाहरणच द्यायचे झाले तर फाइन आर्टस्‌मध्ये एखादे वस्त्र उदाहरणार्थ शर्ट, त्याच्या उपयोगापेक्षा दिसण्यावर जास्त भर असतो, तर अप्लाइड आर्टमध्ये त्याच्या उपयुक्ततेवर भर असतो.
 
एखाद्या फाइन आर्टिस्टला आपल्या वैयक्तिक पसंतीनुसार आकार, रुप, आराखडा निवडीचा अधिकार असतो; पण अप्लाइड आर्टमध्ये आर्टिस्टला व्यक्तिनिरपेक्ष, वस्तुनिष्ठ भूमिका घेत, सौंदर्याचे भान ठेवत, ग्राहकाची गरज व व्यवसायची सांगड घालावी लागते. अप्लाइड आर्ट प्रत्यक्षपणे बाजारव्यवस्थेशी निगडित असल्याने प्रशिक्षित विद्यार्थ्यांना येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तसेच या आर्टचे अभ्यासक्रम विविध व्यापारी संघटना व व्यावसायिक संस्थांशी प्रत्यक्ष जोडलेले असल्याने अनेक हुशार विद्यार्थ्यांना संकल्पनांची व्यावहारिक बाजू व नावीन्यपूर्ण बदल यावर लक्ष केंद्रित करतांना प्रशिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. संभाव्य मालकावर सकारात्मक छाप पाडण्याचा व आपल्या परिचयाला वजन प्राप्त करून देण्याचा हा एक उत्तम मार्ग असतो. जे डिझायनर अप्लाइड आर्ट व डिझाइनच्या प्रश्‍नांना सर्जनशीलपणे प्रतिसाद देतात त्यांना मागणीही खूप असते, तसेच शिक्षण, रिस्टोरेशन, जाहिरातक्षेत्र, संग्रहायलये, विक्री क्षेत्रातही ते यशस्वी कारकीर्द करतात. अनेक जण आपला व्यवसाय सुरू करतात, तर काही तंत्रज्ञ डिझायनर, हस्तव्यवसाय कारागिर म्हणून स्वतंत्रपणे आपली सेवा देतात. अप्लाइड आर्टचा अभ्यासक्रम डिझाइन प्रक्रियेला सर्वसमावेशक मार्ग देऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमात काम करायला प्रोत्साहन देतात. 

पदवीपूर्व तीन ते चार वर्षांच्या काळात विद्यार्थी सिनेमा, छायाचित्रण, कापड उद्योग, सिरॅमिक्‍स अशा विविध क्षेत्रांत अनेक कौशल्ये शिकून, सातत्याने बदलणाऱ्या रोजगाराच्या बाजारपेठेतील संधींना ते यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात म्हणून सर्जनशीलतेबरोबर वितरणव्यवस्था, नेतृत्वाचे मानसशास्त्र, कामाच्या ठिकाणी लागणारे संवादकौशल्य या विषयांचाही या अभ्यासक्रमात समावेश केलेला असतो. अप्लाइड आर्टमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्यातील उपजत कलेचा व्यावसायिक वापर कसा करावा, याचे शिक्षण दिले जाते. रॉयल कॉलेज ऑफ आर्ट- यू. के., पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइन- यू. एस., ऱ्होड आयलन्ड स्कूल ऑफ डिझाइन- यू. एस. इत्यादी ही फाइन आर्टची जगातील ख्यातनाम विद्यापिठे, तर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई, कॉलेज ऑफ आर्टस- नवी दिल्ली, फॅकल्टी ऑफ फाइन आर्टस्‌, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा ही भारतातील काही प्रसिद्ध कला विद्यापिठे आहेत. जगविख्यात कलाकार पाब्लो पिकासोने म्हटल्यानुसार, "कलेचा मुख्य उद्देश आपल्यावरची धूळ झटकून टाकणे हा आहे.'  

इतर ब्लॉग्स