Blog: सिंथिया फरारबाईंच्या समाधीचा अखेर शोध लागला !

Cynthia Farrar, Savitribai Phule, Jyotiba Phule: यांच्या शैक्षणिक कार्याशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडीत अहिल्यानगर येथे सिंथिया फरारबाईंच्या समाधीचा शोध लागला आहे.
Cynthia Farrar’s Tomb Discovered in Ahilyanagar, Highlighting Her Contribution to Savitribai and Jyotiba Phule’s Educational Journey

Cynthia Farrar’s Tomb Discovered in Ahilyanagar, Highlighting Her Contribution to Savitribai and Jyotiba Phule’s Educational Journey

esakal

Updated on: 

जोतिबा फुले यांच्या चालू द्विजयंती शताब्दी वर्षात या महान पुरुषाला स्त्रीशिक्षण कार्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांना अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सिंथिया फरारबाईंच्या नगर येथील समाधीचा अखेर शोध लागावा, यासारखी दुसरी ब्रेकिंग न्युज कुठली असू शकेल?

नाशिकमध्ये परवा सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्यावर मी एक छोटेसे व्याख्यान दिले, रात्री बसने पुण्याला परतलो. काल सकाळी अहिल्यानगरचे साहसी म्हणजे प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संशोधन करणारे प्रशिक्षित इंजिनियर असलेले अभिजीत एकनाथ वाघ, पत्रकारितेतील एक सहकारी भैरवनाथ वाकळे आणि व्यवसायाने टेलर असलेले `मास्टर’ आसिफ खान यांचा फोन आला आणि तडक अहिल्यानगरच्या प्रवासाला निघालो. फरारबाईंच्या समाधीचा शोध लागलाय असे कळल्यानंतर मला घरी स्वस्थ बसेना.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com